सोशल मीडियावर तुम्हाला दररोज अनेक व्हिडीओ पहायला मिळतात. काही उपयोगी, मजेशीर तर काही अगदीच चकित करणारे असतात. तर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. दुचाकीवर पाण्याचे कॅन ठेवायला जागा नसते, तसेच तरुणीला पाण्याचे कॅन आणि एका वृद्ध व्यक्तीला तिच्या छोट्या दुचाकीवर व्यवस्थित बसवायचे असते; यासाठी तरुणी एक अनोखा जुगाड करते.
व्हिडीओत तरुणी एका वृद्ध व्यक्तीला दुचाकीवरून घेऊन जात असते. तसेच त्यांच्याबरोबर पाणी भरून आणण्यासाठी वापरण्यात येणारे अनेक कॅन असतात. तर पाण्याच्या कॅनबरोबर वृद्ध व्यक्तीला कसे बसवायचे, असा प्रश्न तरुणीला पडतो. तर ती एक अनोखा जुगाड करते. वृद्ध व्यक्तीला दुचाकीच्या विरुद्ध दिशेला तोंड करून बसवते. व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघा.
हेही वाचा…तब्बल १५ वर्षानंतर झाली बाप लेकाची भेट, वडिलांना पाहून ढसा ढसा रडला मुलगा, व्हिडीओ व्हायरल
व्हिडीओ नक्की बघा :
दुचाकीवर पाण्याचे कॅन ठेवण्यासाठी जुगाड :
व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, दुचाकीवर पाण्याचे कॅन ठेवायला जागा नसते, म्हणून एक तरुणी अनोखा जुगाड करते. एक पाण्याचा कॅन ती दुचाकीवर लावते आणि त्याच्यावर आणखीन एक कॅन ठेवते. तसेच वृद्ध व्यक्तीच्या हातात दोन कॅन धरायला देते, तर उरलेले कॅन ती वृद्ध व्यक्तीच्या डोक्यावर अगदी मजेशीर पद्धतीने लावून घेते आणि दुचाकी सुरू करून निघून जाते.
व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल की, वृद्ध व्यक्ती कॅन दुचाकीवर ठेवण्याचा प्रयत्न करत असते. पण, तरुणीला तेवढ्यात युक्ती सुचते आणि काही सेकंदात पाण्याचे कॅन व वृद्ध व्यक्तीस दुचाकीवर व्यवस्थित बसवून ती त्यांना घेऊन निघून जाते. सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ @popular.machines या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा जुगाड पाहून अनेक जण मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. तसेच तरुणीचा हा जुगाड सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे.