पाण्यात खेळायला प्रत्येक लहान मुलाला आवडते. अगदी मोठं झाल्यानंतरही अनेकजण पावसाच्या साचलेल्या पाण्यात खेळत लहानपणीच्या दिवसांचा पुन्हा आनंद घेताना दिसतात. प्राण्यांचेदेखील असेच काहीसे असेल. कारण अनेक प्राण्यांना आपण एखाद्या जलाशयामध्ये किंवा पावसाच्या साठलेल्या पाण्यामध्ये मनसोक्त खेळताना पाहिले आहे. पण जर कधी पाण्यात खेळू इच्छिणाऱ्या प्राण्यांना कोणी ‘पाण्यात पाय टाकायचा नाही’ असा दम दिला तर? असेच काहीसे सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये घडले.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दोन कुत्रे गार्डनमध्ये चालत असलेले दिसत आहेत. त्यांच्यासमोर एक पाण्याने भरलेला खड्डा दिसत आहे, तो ओलांडून त्यांना पलीकडे जायचे आहे. ते कदाचित पाण्यात उडी मारुन पुढे जाण्याचा विचार करत असतील, तितक्यात त्यांच्याबरोबर आलेली महिला ‘पाण्यात पाय टाकायचा नाही’ असा दम देते, त्यामुळे ते दोघही निमूटपणे एका बाजुने पुढे जातात. त्यांना लावलेली शिस्त पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. पाहा हा व्हायरल होणारा व्हिडीओ.

आणखी वाचा : ‘देणाऱ्याने देत जावे..’ ब्लॉगरच्या मदतीने गरीब आजींनी सुरू केला नवा व्यवसाय; Viral Video पाहून नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

व्हायरल व्हिडीओ :

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या या कुत्र्यांची नाव ऑस्कर आणि कर्मा आहेत. हे दोघ सोशल मीडियावर बरेच लोकप्रिय आहेत. सध्या त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यांना लावलेल्या शिस्तीचे नेटकरी कौतुक करत आहेत. या व्हिडीओला १० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.