Viral Wild bear takes 400 selfies on hidden camera netizens find them adorable | Loksatta

भावा तुझ्यासमोर मॉडेल फेल! जंगली अस्वलाने कॅमेरा हॅक करून ४०० सेल्फी काढल्या, पोझ बघून लागेल वेड

Viral Photo: जंगली अस्वलाने अलीकडेच एक कॅमेरा हॅक केला होता. सुरुवातीला कुतुहूल म्हणून कदाचित तो कॅमेरा बघत असावा पण जेव्हा ते अस्वल निघून गेल्यावर फोटोग्राफरने कॅमेरा तपासला तेव्हा त्यात..

Wild bear takes 400 selfies on hidden camera netizens find them adorable
जंगली अस्वलाने कॅमेरा हॅक करून ४०० सेल्फी काढल्या, पोझ बघून लागेल वेड (फोटो: ट्विटर)

Wild Bear Clicks Selfies: सहसा प्राण्यांना जंगलात येणारे वाईल्डलाईफ फोटोग्राफर आवडत नाहीत. प्राण्यांच्या प्रायव्हसीच्या आड येणाऱ्या फोटोग्राफर्सवर प्राणी प्रेमी सुद्धा अनेकदा टीका करतात. पण प्रत्येक गोष्टीला अपवाद असतातच नाही का? तसाच काहीसा प्रकार आता एका कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अमेरिकेच्या कोलोरॅडोमधील बोल्डर या खडकाळ पर्वतरांगांमध्ये एका जंगली अस्वलाने अलीकडेच एक कॅमेरा हॅक केला होता. सुरुवातीला कुतुहूल म्हणून कदाचित तो कॅमेरा बघत असावा पण जेव्हा ते अस्वल निघून गेल्यावर फोटोग्राफरने कॅमेरा तपासला तेव्हा त्यात असं काही सापडलं की सगळेच थक्क झाले.

बोल्डर ओपन स्पेस अँड माउंटन पार्क्स (OSMP) प्रशासनाने अलीकडेच एका अस्वलाने कॅमेऱ्यांवर घेतलेले “सेल्फी” शेअर केले आहेत. ही छायाचित्रे नोव्हेंबर २०२२ ला घेण्यात आली होती. त्यानंतर २४ जानेवारीला हे फोटो शेअर केल्यापासून प्रचंड व्हायरल होत आहेत. अनेकांना या अस्वलाच्या जबरदस्त पोझची सुद्धा भुरळ पडली आहे.

या फोटोवर अनेक ट्विटर युजर्सनी कमेंट केल्या आहेत, एक युजर म्हणतो की “मला माहित आहे की अस्वल हे भले मोठे दात आणि नखं असलेला आक्रमक प्राणी आहे, जो धावू शकतो, पोहू शकतो आणि तुमचा चेहरा अगदी बिघडवून ठेवू शकतो. पण या सेल्फी पाहून अस्वल किती स्मार्ट आणि गंमतशीर आहे याचाही अंदाज येतो.” तर दुसरा एक युजर म्हणतो की, “अस्वल आता वन्यजीव मासिकाच्या कव्हर पेजवर येण्यासाठी प्रयत्न करत आहे”.

अस्वलाची सेल्फी कशी झाली क्लिक?

OSMP ने ४६,००० एकरमध्ये नऊ कॅमेरे बसवले आहेत. वन्यजीव कॅमेरे बसवण्याच्या महत्त्वाविषयी बोलताना, OSMP चे वरिष्ठ वन्यजीव पर्यावरणशास्त्रज्ञ विल केली म्हणाले, “मोशन-डिटेक्टिंग कॅमेरे आम्हाला स्थानिक प्रजाती आपल्या सभोवतालच्या लँडस्केपचा कसा वापर करतात याबद्दल अधिक जाणून घेण्याची एक अनोखी संधी देतात. हे कॅमेरे OSMP कर्मचाऱ्यांना महत्त्वाचे वन्यजीव क्षेत्र ओळखण्यात मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. आम्ही त्यांच्याकडून गोळा केलेली माहिती संवेदनशील नैसर्गिक क्षेत्रांचे संरक्षण करण्यात मदत करण्यासाठी निवासस्थान-संरक्षणात्मक उपायांची शिफारस करण्यासाठी वापरतो.

हे ही वाचा<< Video: टॉयलेटला सुद्धा एकत्र जाणाऱ्या जुळ्या बहिणींना व्हायचंय आई; म्हणतात, “एकाच नवऱ्याकडून बाळासाठी..”

OSMP च्या वेबसाईटनुसार, हे कॅमेरे त्यांच्या समोरील हालचाल जाणवल्यावर फोटो क्लिक करू शकतात. रात्रीच्या वेळी कॅमेरे निशाचर प्राण्यांना त्रास न देता फोटो टिपण्यासाठी इन्फ्रारेड प्रकाशाचा वापर करतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 11:06 IST
Next Story
Viral Video: पठाण नव्हे, आता सोशल मीडियावर ‘तेरे नाम’ची हवा, २३ मिलियन लोकांनी पाहिलेला व्हिडीओ एकदा पाहाच