scorecardresearch

Video: टॉयलेटला सुद्धा एकत्र जाणाऱ्या जुळ्या बहिणींना व्हायचंय आई; म्हणतात, “एकाच नवऱ्याकडून बाळासाठी..”

Identical Twins Video: महाराष्ट्रात सुद्धा काही आठवड्यांपूर्वी असेच एक लग्न चर्चेत आले होते. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या जुळ्या बहिणींनी एकाच तरुणाशी लग्न केले होते. यानंतर

Video Identical twins trying to get pregnant at same time from same man TLC show Extreme Sisters Goes To Toilet Together
Video: टॉयलेटला सुद्धा एकत्र जाणाऱ्या जुळ्या बहिणींना व्हायचंय आई (फोटो: इंस्टाग्राम)

Identical Twins Trying To Get Pregnant Together: ऑस्ट्रेलियातील जुळ्या बहिणींची जोडी त्यांच्या एकमेकांवरील प्रेमामुळे ओळखली जाते. अगदी एकच कपडे घालण्यापासून ते बाथरूमला जाण्यापर्यंत सर्वकाही एकत्र करण्यासाठी ही जोडी ओळखले जाते. इथवर ठीक होते पण आता ही जोडी एकाच वेळी गर्भवती होण्याचा प्रयत्न करत आहे.

पर्थ येथील रहिवासी ऍना आणि लुसी डेसिंक, या ३७ वर्षीय बहिणींनी २०२१ पासून एकाच वेळी ठरवून गर्भधारणा करण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे या दोघींचा होणारा नवरा सुद्धा एकच आहे. या तरुणाचे नाव बेन ब्रायन असे असून तो सुद्धा त्यांच्या या वेगळ्याच प्रयत्नाचा एक महत्त्वाचा भाग आहे .

ऍना आणि लुसी सांगतात की, “जेव्हा एक टॉयलेटला जाते तेव्हा दुसरी तिच्याबरोबर जाते; जेव्हा एक आंघोळ करते तेव्हा दुसरी तिच्याबरोबर येते, तुम्ही म्हणाल त्या सर्व गोष्टी आम्ही करतो. आम्ही कधीच वेगळे नसतो. मला वाटत नाही की आम्ही एकमेकांशिवाय काहीच काम करू शकतो. आम्हाला वेगळं होण्याची भीती वाटते म्हणून आम्ही एकत्रच असतो.”

TLC वरील शो ‘एक्सट्रीम सिस्टर्स’ मध्ये त्यांनी आपल्या एकत्र गर्भधारणेच्या प्रयत्नांविषयी सुद्धा सांगितले. त्या म्हणतात, “आम्ही इंटरनेटवरून शिकलो की जेव्हा तुमच्या शरीराचे तापमान वाढते तेव्हा तुम्ही ओव्हुलेशन करत आहात, यातील एका एपिसोडमध्ये त्या एकमेकींचे तापमान तपासात असतात तेव्हा त्यावर तीन अंश दिसल्यावर त्या आनंदाने ओरडतात व म्हणतात आम्ही एकाच वेळी ओव्ह्युलेट करत आहोत आम्ही अगदी सारख्याच आहोत. ‘वुम्बमेट्स’ नावाच्या नव्या एपिसोडमध्ये, त्यांनी बाळाच्या बाहुल्यांसह आई होण्याचा सराव करत असल्याचे दाखवले. अर्थात त्यांच्याप्रमाणेच त्यांची बाळं सुद्धा एकसारखे कपडे घालतात.

जुळ्या बहिणींना एकत्र व्हायचंय आई!

हे ही वाचा << Video: सारा भाभी.. शुबमनला चिडवताना चाहते झाले बेभान; विराट कोहलीने एका सेकंदात असं काही केलं..

दरम्यान ही परदेशातील गोष्ट असली तरी महाराष्ट्रात सुद्धा काही आठवड्यांपूर्वी असेच एक लग्न चर्चेत आले होते. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या जुळ्या बहिणींनी एकाच तरुणाशी लग्न केले होते. यानंतर महिला आयोगाने संबंधित पुरुषावर कारवाईची मागणी केली होती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 09:57 IST
ताज्या बातम्या