Viral Wedding Dance Video: लग्न म्हटलं की, डान्स, मस्ती व धमाल हे आलंच! पण कधी कधी कोणाचं उत्साहातलं पाऊल असंही पडतं की, सगळा इंटरनेट हसून थांबतच नाही. सध्या असाच एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत लग्नातला एक दीर (वराचा भाऊ) इतक्या आत्मविश्वासाने स्टेजखाली डान्स करताना दिसतो की, लोक म्हणतात, “डान्स नाही येत तरी कॉन्फिडन्स लेव्हल पाहा!”

व्हिडीओमध्ये दिसतं की, स्टेजवर नवरदेव-नवरी हसत बसलेले आहेत आणि खाली एक पाहुणा ‘छोटे छोटे भाइयों के बड़े भैया’ या प्रसिद्ध गाण्यावर जबरदस्त एनर्जीने उतरतो. सुरुवातीला सगळ्यांना वाटतं की, आता काहीतरी हटके डान्स बघायला मिळणार! पण पुढच्याच क्षणी तो ज्या हालचाली करतो… त्या पाहून प्रेक्षकांना हसू आवरत नाही.

कधी हात हवेत फेकतो, कधी पाय इकडे-तिकडे झाडतो, कधी अचानक गोल फिरतो आणि कधी अशा पद्धतीने थिरकतो की, ताल, बीट किंवा गाणं काहीच परस्परांशी जुळत नाही; पण तरीही त्याचा आत्मविश्वास मात्र तुफान! असं वाटतं की, जणू तो आपल्या जगात हरवून नाचतोय.

नवरदेव-नवरी स्टेजवर बसून एकमेकांकडे पाहत हसतात; तर आजूबाजूचे पाहुणे मोबाईल काढून व्हिडीओ बनवून लागतात. काही जण तर इतके हसतात की, त्यांच्या डोळ्यांत पाणी येतं. नेटिझन्सनी या व्हिडीओला नाव दिलं आहे “डान्सचा देवरसम्राट!”

हा व्हिडीओ @abhaykumardance या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, काही तासांतच लाखो लोकांनी तो पाहिला आहे. कमेंट्समध्ये लोक भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. एक युजर म्हणतो, “मृत्यू यावा; पण असा कॉन्फिडन्स नको!” तर दुसरा लिहितो, “भाऊ, असा डान्स करायचं असेल, तर आधी घरात सराव करून या!” आणखी एकाने मजेत लिहिले, “डान्स नाही येत; पण लाजही नाही राहिली दिसत!”

नेटिझन्सच्या या कमेंट्स वाचूनच लोकांच्या हसण्याचा पुन्हा एक राऊंड सुरू होतो. काहींनी या दीराला “कॉन्फिडन्सचा बाप”, असे म्हटलेय, तर काही म्हणतात “लग्नाचं वातावरण त्यानंच जिवंत केलं!”

सध्या हा व्हिडीओ इतका चर्चेत आहे की, अनेक पेजेसवर तो रीशेअर होत आहे. कुणी म्हणते, “वहिनीनं बघितलं, तर लाजेल”, तर कुणी म्हणते “असा दीर घरात असला की, लग्नं कायम हसरी राहतात.”

येथे पाहा व्हिडीओ