Weeding Viral Video: सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून सोशल मीडियावर लग्नातील हटके रील्स, व्हिडीओ आणि फोटो सतत व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये लग्नातील अनेक गमतीजमती, अनोख्या प्रथा, हटके उखाणे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक भन्नाट व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात एक नवरी तिच्या लग्नात नवऱ्याबरोबर नाचताना दिसतेय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लग्न प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात खूप सुंदर आणि आयुष्य बदलणारा क्षण असतो, त्यामुळे या दिवशी वधू आणि वर त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहतील अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. सुंदर कपडे, दागिने, मेकअप यासह डान्स, फोटोशूट अशा अनेक गोष्टींची आधीपासून तयारी केली जाते. आजपर्यंत अनेक लग्नांमधील काही हटके घटना आपण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या पाहिल्या असतील. आतादेखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक नवरी तिच्या लग्नात नाचण्यासाठी पुढे येते. यावेळी ती तिच्या होणाऱ्या पतीलाही ओढते आणि नाचायला लावते. यावेळी ते दोघेही वेगळ्या पद्धतीचा डान्स करताना दिसतात. नवऱ्याला डान्स करायला फारसं जमत नाही, त्यामुळे नवरी त्याला सांभाळून घेते. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @we2gether_school_of_dance या अकाउंटवर शेअर केला असून, यावर आतापर्यंत ११ मिलियनहून अधिक व्ह्युज आणि दोन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत.

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘तो तिच्यासाठी काहीही करू शकतो’, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘त्याला डान्स करायला जमत नाही, तरीही तो मनापासून करतोय’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘जेव्हा दोघांनाही नाचता येत नाही… पण बघायला खूप छान वाटतंय’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘नवरी खूप हौशी दिसते.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Weeding viral video bride dance with groom funny dance viral on social media sap