Right Sequence TO Do Yoga : दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही पण आपल्या सुदृढ आरोग्यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे.अनेक जण व्यायाम करतात किंवा योगा करतात पण त्यांना योगाभ्यास कोणत्या क्रमाने करावा, हे माहिती नसते. सुरूवातीला वार्मअप करावा की योगासने, सुर्यनमस्कार घालावा की प्राणायम हे समजत नाही पण आज आपण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. योग अभ्यासक मृणालिनी यांनी यासंदर्भात माहिती देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी कोणत्या क्रमाने योगाभ्यास करावा, याविषयी सांगितले आहे. जाणून घ्या, त्यांनी काय सांगितले…

व्हिडीओ

योग अभ्यासक मृणालिनी इन्स्टाग्रामवर योगसंदर्भात अनेक व्हिडीओ शेअर करत असतात. वेगवेगळ्या योगांचे प्रकार आणि त्याचे फायदे त्या सांगतात आणि योगा करून सुद्धा दाखवतात. त्याचप्रमाणे त्यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये
त्यांनी क्रमवारपणे योगाभ्यास करून दाखवला आहे. त्या सुरूवातीला सूक्ष्मव्यायाम किंवा वार्मअप करताना दिसतात. त्यानंतर त्या सूर्यनमस्कार करतात. त्यानंतर त्या त्यांच्या आवडीचे योगासने करतात. त्यानंतर त्या शवासन करतात आणि त्यानंतर त्या प्राणायम करतात. शेवटी त्या ध्यान करतात आणि ओम उच्चारतात. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत त्यांनी करून दाखवलेला योगाभ्यास तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो.

हेही वाचा : Personality Traits : केसांच्या रंगावरून ओळखा व्यक्तीचा स्वभाव, तुमच्या केसांचा रंग कोणता?

yogamarathi_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कोणताही व्यायाम / योगासने जास्त वेळ केल्याने जास्त फायदा होतो अशी मानसिकता असते परंतु खर तर, व्यायाम जास्त करण्यापेक्षा कमी केला तरीही चालेल पण अचूक व योग्य क्रमाने करणं जास्त महत्वाचे आहे, कारण तेच आपल्याला जास्त फायद्याचे ठरते.”

त्यांच्या या व्हिडीओवर अनेक युजर्सनी माहिती दिली आहे. एका युजरने लिहिलेय, “खूप छान माहिती दिली. अशीच माहिती द्या.” तर एका युजरने लिहिलेय, “कोणती योगासने नियमित केली पाहिजे, त्यावर पण एक व्हिडीओ बनवा” आणखी एका युजरने लिहिलेय, “मस्त हो, योग गुरू”