सोशल मीडियावर अनेक प्रेमी युगुलांचे भन्नाट किस्से व्हायरल होत असतात. त्यातील काही किस्से आपणाला पोट धरुन हसवतात तर काही आपणाला थक्क करतात. सध्या अशाच प्रेमी युगुलांचे व्हाट्सअ‍ॅपने चॅटींग व्हायरल होत आहे. जे पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेकजण आपल्या जोडीदाराबरोबर भांडणं झाल्यावर किंवा रिलेशनशीपचा कंटाळा आल्यानंतर ब्रेकअप करतात. यासाठी ते समोरच्या व्यक्तीला थेट फोन करतात किंवा मेसेज करुन, भेटून आपलं नातं संपवतात. पण तुम्ही कधी ऑफिशियल ब्रेकअप केल्याचं पाहिलं आहे का? तुमचं उत्तर नाही असं असेल तर आज आम्ही तुम्हाला एक ऑफिशियल ब्रेकअपचा किस्सा सांगणार आहोत.

हेही पाहा- मेंढ्या नेण्यासाठी शेतकऱ्याने केलेल्या जुगाडाची उद्योगपतींना पडली भुरळ, video पाहून म्हणाले; “कठीण समस्येचा..”

कारण एका व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेंडसोबत असलेले आपले संबंध तोडण्यासाठी एखाद्या कंपनीप्रमाणे ‘लेटर टू क्लोजर’ पाठवले आहे. सध्या त्या बॉयफ्रेंडचे पत्र सोशल मीडियावर एक चर्चेचा विषय ठरला आहे. @velin_s नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन या ब्रेकअपची माहीती देण्यात आली आहे. शिवाय गर्लफ्रेंडशी चॅटींग केल्याचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे.

व्हॉट्सअॅपवर गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप

व्हायरल होत असलेल्या ब्रेकअपच्या स्टोरीमधील जोडपे अशा टप्प्यावर पोहोचले होते की, ते दोघे पुन्हा एकत्र येणं अशक्य होते. त्यामुळे दोघेही एकमेकांपासून चांगल्यापणाने वेगळे झाले आहेत. पण हद्द तेव्हा झाली जेव्हा घटनेतील वेलिनने त्याच्या गर्लफ्रेंडला सही करण्यासाठी आणि अधिकृतपणे वेगळे होण्यासाठी ‘लेटर टू क्लोजर’ पाठवले आहे. वेलिनने त्याच्या जोडीदारासोबतच्या संभाषणाचा स्क्रीनशॉट शेअर केला, जिथे त्याने तिला डॉक्युमेंट पाठवले आणि तिने फक्त “व्वा” असे उत्तर दिले. मग त्याने गर्लफ्रेंडला कागदपत्रावर सही करण्यास सांगितले, ज्यामुळे ती गोंधळली आणि सही कशी करायची विचारलं, त्यानंतर प्रियकराने तिला सर्व प्रक्रिया समजावून सांगितली.

हेही पाहा- Video: तरुणाचा लग्नातील तो डान्स अखेरचा ठरला; लोक शिट्टी वाजवत राहिले आणि तो मृत्यूशी झुंजत…

इतकच नव्हे तर प्रियकराने प्रेयसीला लिहिलेलं पत्रदेखील ट्विटरवर शेअर केलं आहे. ज्यात लिहिले आहे की, “मला आशा आहे की तुम्हाला हे पत्र तुमचे आरोग्य चांगले असताना मिळेल. मला त्रास देत असलेल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि आपल्या नातेसंबंधावर पुनर्विचार करण्‍यासाठी मला थोडा वेळ हवा आहे. मला नुकतेच काही अशी गोष्ट कळाली आहे, ज्यामुळे मी वेगळं होण्याचा निर्णय घेत आहे. मला तुला कळवण्‍यास खेद वाटतो की मी आपले नाते पुढे चालू ठेवू शकत नाही.” ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेकजण थक्क झाले असून नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp chat viral boyfriend send letter of closure to breakup with girlfriend on whatsapp photo viral jap