Viral video: सोशल मीडियावर लग्नातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. गेल्या काही दिवसात मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सध्या लग्नात प्रत्येक इव्हेंटच अगदी स्पेशल असतो. तशीच खास तयारी केली जाते नवरा नवरीच्या लग्नमंडपात होणाऱ्या एन्ट्रीसाठी. हल्ली लग्न मंडपात वधूची एन्ट्री कशी असेल याकडे वऱ्हाडी मंडळीचं लक्ष लागून असतं. यासाठी काही विशेष व्यवस्थापन केलं जातं. लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. अगदी सध्या नवरा-नवरीसुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राइझ देण्याचा प्रयत्न करतात. अशाच नवरा नवरीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये १३ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघं जेव्हा पहिल्यांदा एकमेकांना लग्नाच्या दिवशी पाहतात तेव्हा काय होतं पाहा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मैत्रीचा प्रवासलग्न म्हणजे एक सुंदर प्रवास. त्याची वाट एखादेवेळी खडतर असेल पण स्वतःला आणि जोडीदाराला दिलेलं वचन पाळणं महत्वाचं असतं. पती-पत्नीपेक्षाही चांगले मित्र म्हणून राहणं जास्त गरजेचं असतं. एकमेकांना मानसिक आधार दिला तर हे नातं टिकू शकतं. आपलं हक्काचं माणूस आपल्यासोबत आहे हे फीलिंग लग्नच आपल्याला देत असतं. अशीच कित्येक वर्ष स्वप्न पाहिल्यानंतर जेव्हा तो दिवस प्रत्यक्षात येतो तेव्हा दोघांचाही आनंद गगनात मावत नाही.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवरा नवरी लग्नाच्या दिवशी तयार झाल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा एकमेकांना पाहतात तेव्हा दोघांनाही अश्रू अनावर होतं. लग्नाच्या पोषाखात एकमेकांना बघून दोघांनाही इतका आनंद होतो की दोघंही खूप भावूक होतात. लग्नात नवरा-नवरीच्या एन्ट्रीच्या बाबतीत पूर्वीपेक्षा बरेच बदल झाले आहेत. आता नवरा नवरीचा हात पकडत किंवा नवरी लाजत मान खाली घालून चालत प्रवेश करत नाहीत. अरेंज मॅरेज असो लव्ह मॅरेज असो… लग्नात नवरा-नवरीची एन्ट्री हा विषय पाहण्यासारखा झालाय. 

पाहा व्हिडीओ

नवरा- नवरीचा हा व्हिडियो सोशल मिडियावर शेअर झाला असून तो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत तुफान हीट झाला आहे. अवघ्या काही दिवसांतच या व्हिडियोला लाखो लाईक्स मिळाले असून नेटकरी पुन्हा पुन्हा हा सुंदर डान्स बघत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When 13 years of love comes true see what the husband and wife did when they saw each other on their wedding day video goes viral srk