“भारतीय नागरिकांना परदेशात वारंवार गैरवर्तनाचा सामना करावा लागतो. करिअरच्या संधी किंवा उच्च शिक्षणासाठी परदेशात स्थलांतरित होणाऱ्या अनेक भारतीयांना स्थानिक लोकांकडून अनेकदा द्वेष आणि गैरवर्तनाचा सामना करावा लागतो. यामुळे एकाकीपणा, चिंता आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते. विदेशाच्या अर्थव्यवस्थेत आणि समाजात त्यांचे योगदान असूनही, भारतीय नागरिक अनेकदा त्यांचे हक्क मिळवण्यासाठी आणि योग्य वागणूक मिळविण्यासाठी संघर्ष करतात. दरम्यान या संघर्षावर प्रकाश टाकणारा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
एका अमेरिकन व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी एका भारतीय व्यक्तीवर अरेरावी केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून संतापाची लाट उसळली आहे. व्हिडीओमध्य एका भारतीय माणसाला पार्किंगमधून बाहेर पडताना दिसत आहे. एक अमेरिकन नागरिक त्याला थांबवतो आणि विचारतो की, “तू माझ्या देशात का आहेस?”
अमेरिकन नागरिकाच्या प्रश्नामुळे गोंधळलेल्या भारतीय नागरिकाने काहीच प्रतिक्रिया दिले नाही.
“मला इथे तुम्ही लोक आवडत नाही. इथे तुमचे खूप लोक आहेत. तुम्ही सर्व भारतीय गौरवर्णियांचे देश भरून टाकत आहात. मला याचा कंटाळा आला आहे. अमेरिकन लोक या गोष्टीला कंटाळले आहेत**. मला वाटते तुम्ही भारतात परत जावे, असे तो अमेरिकन नागरिक म्हणत आहे.
भारतीय व्यक्ती फक्त ठीक आहे म्हणतो आणि तेथून निघून जातो. त्यानंतरही तो व्यक्ती व्हिडीओमध्ये भारतीय व्यक्तींना दोष देताना दिसत आहे. “या भयानक लोकांचा देशावर हल्ला पाहून कंटाळा आला आहे. भयानक बकवास,” असे तो पुढे म्हणताना दिसतो.@gharkekaleshनावाच्या पेजवर हा व्हिडिओ शेअर केला आहे, अमेरिकन नागरिक भारतीय व्यक्तीला जाब विचारतोय.
या व्हिडिओने लगेचच नेटकऱ्यांचे लक्ष वेधले. व्हिडीओ दहा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आणि अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्या अमेरिकन माणसावर टीका केली.
“त्याने कायदेशीररित्या तिथे आलेल्या माणसाला जाब विचारण्याऐवजी आपल्या सरकारला हा प्रश्न विचारायला हवा होता. पण नाही. त्यांना कोणताही प्रश्न न विचारता आनंदाने त्यांचे सरकार निवडून देतात, परंतु कायदेशीररित्या तिथे असलेल्या लोकांना त्रास देतील,” असे एका वापरकर्त्याने म्हटले.
दुसऱ्या वापरकर्त्याने कमेंटकेली, “काहीही नाही, त्यांना फक्त भारतीयांची भीती वाटते! त्यांना माहिती आहे की आपण किती प्रतिभावान, सक्षम आणि प्रगतीशील आहोत. हे फक्त त्यांची असुरक्षितता दर्शवते. ते आम्हाला धोका म्हणून पाहतात.”
“या प्रकारचा संवाद दुर्दैवाने अधिक सामान्य होत चालला आहे. हे सहसा त्यांच्या मनात रुजलेल्या असुरक्षिततेतून निर्माण होते या माणसाकडे कदाचित इतर गोऱ्या लोकांच्या कामगिरीशिवाय अभिमान बाळगण्यासारखे दुसरे काही नाही,” तिसऱ्या वापरकर्त्याने प्रतिक्रिया दिली.