Marathi Language Controversy Viral Video : गेल्या काही महिन्यांपासून वारंवार मराठी भाषा बोलण्यावरून वाद निर्माण होत आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या परप्रातीयांवर मराठी भाषेत बोलण्याचा दबाव टाकला जात असल्याचा आणि मराठी भाषेत बोलण्यास नकार दिल्याचे काही व्हिडिओ देखील समोर आले आहे. दरम्यान पुन्हा एका मराठी भाषा बोलण्यावरून झालेल्या वादाचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एका हिंदी भाषिक तरुणीला मराठी भाषेत बोलण्यासाठी दबाव टाकला जात आहे आणि ती तरुणी मराठी भाषा येत नसल्याचे सांगून मराठी बोलण्यास नकार देत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हायरल व्हिडीओमुळे पुन्हा एकदा मराठी भाषेचा वाद पेटला आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला तर अनेकांनी जोरदार टिका केली.
महाराष्ट्रात अनेक परप्रांतीय राहतात पण कित्येक वर्ष येथे राहूनही त्यांना मराठी भाषा बोलता येत नाही. अनेक लोक हिंदी भाषाच बोलतात. गेल्या काही दिवसांपासून परप्रातियांनी मराठीत बोलण्याचा आग्रह केला जात आहे. अनेकांनी या आग्रहाला थेट विरोध केल्याचे अनेक घटनाही घडल्या आहे. अशा स्थितीतमध्ये पुन्हा नवा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक हिंदी भाषिक तरुणीला एक व्यक्ती मराठीत बोलण्याचा आग्रह करते पण ती “नहीं आता मुझे मराठी”(नाही येत मला मराठी) असे सांगते. त्यावर ती व्यक्ती तिला जाब विचारते की, “का नाही येत मराठी, कुठल्या ऑफिसमध्ये कामाला आहे. मराठी बोलायला लागणार तुला. का नाही बोलणार तू मराठी.”
त्यावर ती तरुणी हिंदी भाषेत उत्तर देते की, “भाषा है वो, नहीं आता.” (भाषा आहे ती, नाही येत मला.)
त्यावर संतापलेली व्यक्ती म्हणते की, मग, महाराष्ट्रात कशाला राहते तू, इकडून निघायचे.
त्यावर ती तरुणी हिंदी भाषेत उत्तर देते की, मेरी मर्जीसे रेहती हूं, मेरा खुद का घर हैं यहा.” (माझ्या मर्जीने राहते, माझे स्वत:चे घर आहे इथे)
त्यावर ती व्यक्ती हिंदीमध्ये विचारते की,”गावं किधर हैं तेरा”(गाव कुठे आहे तुझे),
त्यावर तरी तरुणी उत्तर देते की, मेरा गांव कहीं पर भी है, नहीं करूंगी मराठी में बात, मेरी जबान, मेरी मर्जी (माझं गाव कुठेही असो, मी मराठीत बोलणार नाही, ती माझी भाषा आहे, ती माझी निवड आहे.)
इंस्टाग्रामवरgully.gupshup नावाच्या पेजवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे,”महाराष्ट्रात, एका महिलेवर मराठी बोलण्यासाठी दबाव आणला गेला तेव्हा जोरदार संघर्ष सुरू झाला. तिने तिच्या भूमिकेवर ठाम राहून म्हटले, “माझा आवाज, माझा लय, माझी भाषा – मला जे हवे ते मी बोलेन.” ही घटना वाढत्या भाषिक तणावावर प्रकाश टाकते, स्थानिक लोक मराठी वापरावर आग्रह धरत आहेत तर काही लोक त्यांची भाषा मुक्तपणे निवडण्याच्या अधिकाराचे रक्षण करतात.”
अनेकांनी तरुणीचे कौतुक केले तर अनेकांनी तिचे समर्थन केले. एकाने कमेंटमध्ये लिहिल की भाषा हे दुवा आहे. तुम्ही एखाद्याला मराठी किंवा कोणतीही भाषा बोलण्याची सक्ती करू शकत नाही. संवाद हा दबावातून नव्हे तर आदरातून आला पाहिजे. एखाद्याला अशी भाषा वापरण्यास भाग पाडल्याने जी त्यांना सोयीची वाटत नाही, त्यामुळे अनावश्यक तणाव निर्माण होतो आणि लोकांमध्ये आणखी फूट पडते. चला संघर्ष नाही तर समजूतदारपणा वाढवूया. तुमची भाषा अभिमानाने बोला, पण इतरांनाही तेच करू द्या.”
दुसऱ्याने कमेट केली की,” हा काय मूर्खपणा आहे? खेड्यापाड्यातील लोक मुंबई शहरात येत आहेत आणि भाषेच्या नावाखाली मुंबईकरांना विचारत आहेत आणि त्रास देत आहेत. एके दिवशी हा माणूस माझ्याकडे पैसेही मागत होता आणि मी नकार दिल्यावर तो मराठीतून बोलू लागला. मी उत्तर दिले की तुम्ही ज्या गावातून आला आहात तिथे निघून जा.. किंवा संविधान बदला…”