जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाचा मृत्यू हा अटळ आहे. पण मृत्य कधी आणि कोणत्या कारणाने होईल हे सांगता येत नाही. कधी कोणाचे मरण येईल सांगता येत नाही! अनेकदा एखादा अपघात किंवा आपत्तीमुळे काहींना आपला जीव गमावावा लागतो. पण कधी अगदी धडधाकड वाटणारी व्यक्तीला पुढच्याक्षणी मृत्यूचा सामना करावा लागतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. लग्नामध्ये डान्स करताना एका तरुणीचा अचानक मृत्यू झाला आहे. हॉर्ट अटॅकमुळे तरुणीचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. ही घटना व्हिडीओमध्ये कैद झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लग्नात तरुणीचा हार्ट अटॅकने मृत्यू

मध्य प्रदेशातील एका लग्न समारंभात एका निरोगी दिसणाऱ्या व्यक्तीचा अचानक हॉर्ट अटॅकमुळे मृत्यू झाल्याची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी (८ फेब्रुवारी) विदिशा शहरात(Vidisha city) ही घटना घडली जिथे एका महिलेचा तिच्या चुलत बहिणीच्या लग्न समारंभात डान्स करत असताना स्टेजवरच धाडकन कोसळली आणि हॉर्ट अटॅक आल्याने तिचा मृत्यू झाला आहे.

नाचता नाचता अचानक स्टेजवर कोसळली अन्..

परिणीता जैन असे या महिलेचे नाव आहे. ती इंदूरची रहिवासी होती आणि काल विदिशा येथे तिच्या चुलत बहिणीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी आली होती. ‘संगीत’ समारंभात नृत्य करताना अचानक ती स्टेजवर कोसळली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले (Doctors declare her dead )

लोक तिला तपासण्यासाठी गेले पण तिने प्रतिसाद न दिल्याने तिच्या कुटुंबियांनी तिला रुग्णालयात नेले जिथे तिला मृत घोषित करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की,”तिला हृदयविकाराचा झटका आला होता परंतु तिच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की, तिला पूर्वी कोणताही आजार नव्हता.”

हॉर्ट अटॅकमुळे अचानक मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. कधी जीममध्ये व्यायाम करताना, कधी बोलता बोलता अचानक हॉर्ट अटॅक आल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. यात आता आणखी एक व्हिडीओची भर पडली आहे. काही दिवसांपूर्वीच एका शाळकरी मुलीला हॉर्ट अटॅक आल्याने तिचा मृत्यू झाला होता या घटनेचा व्हिडिओ देखील चर्चेत आला होता. तसेच तेलंगणातील महबूबनगर जिल्ह्यातील एका १६ वर्षीय मुलीचा शाळेच्या निरोप समारंभात सादरीकरण करताना कोसळून मृत्यू झाला. सजवत रोजा असे या मुलीचे नाव असून ती एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमध्ये पहिल्या वर्षाची इंटरमिजिएटची विद्यार्थिनी होती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman dies of heart attack while dancing at wedding function shocking video viral snk