Shocking video: अंडे खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अंड्यामध्ये उच्च दर्जाचे प्रथिने, जीवनसत्त्वे, लोह इत्यादी सर्व पोषक घटकांमध्ये असतात, जे शरीरासाठी अत्यंत महत्वाचे असतात. जिममध्ये जाणारे बहुतेक लोक त्यांच्या प्रोटीन डाएटला पूरक म्हणून त्यांच्या आहारात अंडी समाविष्ट करतात. पण जरा कल्पना करा की, तुमच्या जेवणाच्या ताटात ठेवलेली अंड्यामध्ये मेलेलं पिल्लू असेल तर? घाबरलात ना? थांबा विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ पाहा तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. मात्र सध्या समोर आलेला धक्कादायक व्हिडीओपाहून तुम्हीही यापुढे अंडी खाताना शंभर वेळा विचार कराल. कारण एका महिलेला अंड उकडल्यानंतर अंड्यामध्ये चक्क मेलेलं पिल्लू सापडलं आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ रोज व्हायरल झाले आहेत. काही व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता अंड्याचं कालवण करण्यासाठी महिलेनं अंडी उकडली होती. यावेळी त्या अंड्यामध्ये चक्क मेलेलं पिल्लू आढळलंय. व्हिडीओमध्ये तरुणी हे सापाचं पिल्लू अंड्यामध्ये अडकल्याचा दावा करत आहे. त्यामुळे इथून पुढे अंडी खाताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे. मात्र हे सापाचं पिल्लू नसून कोंबडीच्या पिल्लानं नुकताच जीव धरल्याचं दिसत आहे. बाजारात आधीच मोठ्या प्रमाणावर आपली फसवणूक होत असते. भेसळयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही. कारण आता सर्वच पदार्थांमध्ये भेसळ केली जाते, त्यामुळेच हल्ली आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ krantinewsofficial नावाच्या इन्स्टाग्रा अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

घरीच या पद्धतीने तपासणी करून ओळखा प्लास्टिकच्या व ख-या अंड्यातील फरक

  • अंडी हलवण्याचा प्रयत्न करा – जर त्यात काही आवाज येत असेल तर ते बनावट असू शकते.
  • अंडी फोडा आणि पहा- असे करताना पिवळे आणि पांढरे भाग एकमेकांत मिसळले तर अंडी बनावट असू शकतात.
  • एका ग्लास पाणी घेऊन त्यात अंडे ठेवा – असे म्हणतात की जर अंडे खरे असेल तर ते पाण्यात बुडते, तर नकली अंडे पाण्यात तरंगते.
  • अंडी जाळण्याचा प्रयत्न करा – जर अंडे खरे असेल तर त्यावर फक्त एक काळी खूण दिसून येईल, जर ते बनावट असेल तर अंडी जळण्यास सुरवात होईल.