सोशल मीडियावर अनेकदा असे काही व्हिडिओ व्हायरल होतात, जे पाहिल्यानंतर आपलं हृदय भरून येतं. शिवाय गरीब लोकांची परिस्थिती पाहून आपणाला वाईटही वाटतं. मात्र, या जगात असे अनेक लोक आहेत जे आपल्या आहे त्या परिस्थितही मनसोक्त जगत असतात. नुकताच दोन लहान मुलांनी केकसाठी पैसे नाहीत म्हणून भाकरीवर मेणबत्ती लावून वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. अशातच आता एका महिलेचा व्हिडीओ पाहून नेटकरी हेच खरं मोटिव्हेशन असल्याचं म्हणत आहेत. या व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या परिस्थितीशी संघर्ष करताना दिसत आहे. एवढा त्रास सहन करुनही तिच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून अनेकजण तिचं कौतुक करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर अनेक असे व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यामध्ये लोकांना काही पैशांसाठी जीवघेणा संघर्ष करावा लागतो. त्याप्रमाणे ही महिला देखील असाच संघर्ष करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. अशा हालाखीच्या परिस्थितीतही तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र कमी झालेला नाही. त्यामुळेच हा व्हिडिओ नेटकऱ्यांना खूप भावला आहे.

हेही पाहा- पक्ष्यांपासून पिकाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्याचा भन्नाट जुगाड; Video पाहून तुम्हीही कौतुक कराल

हा व्हायरल व्हिडिओ @Aarzaai_Ishq नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये एक महिला स्टेशनवर उभी असलेल्या रेल्वेतील प्रवाशांना खाद्यपदार्थ विकताना दिसत आहे. शिवाय ती ज्या डब्यातील लोक आवाज देतील त्यांच्याकडे धावत जात त्यांना वस्तू विकत आहे. मात्र, वेळ कमी असल्याने आणि रेल्वे सुटायच्या भीतीने ती खूप जोरात एका डब्याकडून दुसऱ्या डब्याकडे धावत जाताना दिसत आहे. तिची ही धावपळ पाहून एका प्रवाशाने तिचा व्हिडीओ शूट केला यावेळी तिच्या चेहऱ्यावरील स्मित हास्यदेखील कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

हेही पाहा- भाजीविक्रेता रात्रीत बनला १७२ कोटींचा मालक! आता पोलिस ठाण्याच्या मारतोय चकरा; का ते जाणून घ्या

नेटकऱ्यांनी केलं कौतुक –

गरिबी आणि असाह्य अवस्थेत जीवन जगण्याची धडपड सुरू असतानाही, महिलेच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून अनेकजण तिचं कौतुक करत आहेत. आतापर्यंत व्हिडिओला एक लाखाहून अधिक व्ह्यूज आणि ५ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओ पाहताना यूजर्स सतत कमेंट करत आहेत आणि महिलेला खूप मोटिव्हेशनल म्हणत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘चोरी आणि भीक मागण्यापेक्षा कठोर परिश्रम करणं कधीही चांगलं.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman is seen struggling to live life even in condition still with a smile on her face netizens praised the woman jap