भावाभावांमधील भांडणं, वाद हे आपल्यासाठी नवे नाही. सख्खे भाऊ पक्के वैरी कधी होतात हे कळतही नाही. भावाभावांच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ आपण आतापर्यंत सोशल मीडियावर पाहिले असतील. मात्र आता समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. तसेच, हा व्हिडीओ पाहून तुम्हाला वाईटही वाटेल, अन् एकच प्रश्न मनात यईल ते म्हणजे, सख्खे भाऊ का एकमेकांच्या जीवावर उठत असतील. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शेतात दोन भाऊ आहेत. त्यातील एक जण ट्रॅक्टरमध्ये बसलेला आहे तर दुसरा ट्रॅक्टर अडवत समोर उभा आहे. या व्हिडीओत हे दोघे भाऊ एकमेकांना विरोध करताना दिसत आहेत. ट्रॅक्टरमध्ये बसलेला भाऊ खाली उभ्या असणाऱ्या भावाच्या अंगावर अक्षरश: ट्रॅक्टर घालत आहे. यावेळी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे, मात्र तरीही ते दोघेही एकत नाहीत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहिलं तर हा वाद शेतीच्या कारणावरुन झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हा वाद इतका विकोपाला गेला आहे, की एक भाऊ दुसऱ्या भावाच्या अंगावर ट्रॅक्टर घालायलाही मागे पुढे बघत नाही.

पाहा व्हिडीओ

https://www.facebook.com/reel/269830612217932

हेही वाचा – Video: महिलांची एसी लोकलमध्ये तुफान हाणामारी, सीटवरुन सुरु झालेली भांडणं ते लाथा-बुक्क्यांची बरसात

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेचकरीही व्हिडीओ पाहून संतापले आहेत. व्हिडीओवर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.