सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यापैकी सर्वाधिक व्हायरल होणारे व्हिडीओ हे प्राण्यांचे असतात.प्राण्यांच्या अनेक करामती पाहायला मिळतात. दरम्यान तुम्ही आतापर्यंत बऱ्याचवेळा झेब्रा क्रॉसिंगचा उपयोग करुन रस्ता क्रॉस केला असेलच. पण विचार करा जर झेब्रा क्रॉसिंगवरुन रस्ता क्रॉस करताना तुमच्या बाजूला खरच झेब्रा आला तर? असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक झेब्रा थेट रस्त्यावर येत झेब्रा क्रॉसिंगवर रस्ता ओलांडताना दिसत आहे..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झेब्रा पोहोचला थेट झेब्रा क्रॉसिंगवर –

या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दक्षिण कोरियाची राजधानी सिओलमध्ये एक झेब्रा रस्ता ओलांडताना दिसत आहे. रस्त्यावर अचानक झेब्रा आल्यानं सर्वांचे लक्ष या झेब्राने वेधून घेतले. मात्र रस्त्यावर फिरणारा हा झेब्रा सिओल चिल्ड्रन ग्रँड पार्क प्राणीसंग्रहालयातून पळून आला आहे. लाकडाचं कुंपण तोडून पळून जाण्यात झेब्रा यशस्वी झाला. यावेळी रस्त्यावर अनेक लोक ये जा करत आहेत, तसेच वाहतूक सुरु आहे. प्राणी संग्राहालयातून पळून आलेला झेब्रा हा झेब्रा क्रॉसिंगवर फिरत होता. त्याला पकडण्यासाठी अनेक प्रयत्न करत होते मात्र तो कुणालाच पकडता येत नव्हतं.

पाहा व्हिडीओ –

अखेर तीन तासांच्या प्रयत्नांनंतर या झेब्र्याला एका जाळीच्या आधारे पकडून प्राणी संग्राहालयात सोडण्यात आले. दरम्यान या झेब्राचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा – काय सांगता! दोन मिनिटांत मॅगीच नव्हे, बिअरही बनते, पण कशी?

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून @Hyunsu Yim आणि @Bloomberg या अकाउंट्सवरुन हा शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओंना लाखो व्ह्युज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zebra escapes from zoo wanders around south koreas capital seoul before being caught srk