..म्हणून नेहासाठी ‘हा’ दागिना आहे खूपच खास  !

सोनम कपूरच्या लग्नानंतर काही दिवसातच अभिनेत्री नेहा धुपियाने अंगद बेदी याच्याशी लग्नगाठ बांधली.

neha and angad
नेहा धुपिया-अंगद बेदी

बॉलिवूडची ‘फॅशन आयकॉन’ सोनम कपूर आणि आनंद आहुजा याच्या लग्नाच्या चर्चा थांबत नाहीत तोच आता बॉलिवूडमधील अशाच एका अभिनेत्रीच्या लग्नावरुन चर्चा रंगत आहे. सोनम कपूरच्या लग्नानंतर काही दिवसातच अभिनेत्री नेहा धुपियाने अंगद बेदी याच्याशी लग्नगाठ बांधली. मात्र, नेहाने अगदी साध्या आणि गुपचूप पद्धतीने लग्न केल्याचे यावेळी दिसून आले. काही दिवसांपूर्वीच तिने लग्नात परिधान केलेल्या लेहंग्याची चर्चा रंगत होती. त्यातच आता तिच्या वेडिंग रिंगची चर्चा होताना दिसत आहे.

नेहाने जरी गुप्तता पाळत लग्न केले असले तरी तिच्या लग्नाची चर्चा मात्र जोरदार सुरु आहे. लग्नामध्ये नेहा अगदी साध्या पद्धतीने तयार झाली होती. मात्र तरीदेखील तिच्या हातातल्या अंगठीकडे उपस्थितांचे लक्ष आकर्षिले गेले. नेहाने घातलेली ही अंगठी साधारण नसून बेदी कुटुंबियांसाठी अनमोल आहे. ही अंगठी नेहाला बेदी कुटुंबाच्या वारसा हक्काने मिळाली आहे. विशेष म्हणजे ही अंगठी नव्या डिझाइनची नसून ती परंपरागत चालत आलेल्या डिझाइनची आहे.

NEHA-DHUPIA
वेडिंग रिंग

डीएनए या वृत्तपत्रानुसार, ही अंगठी म्हणजे बेदी कुटुंबाचा पारंपारिक दागिना आहे. ही अंगठी एका पिढीकडून दुस-या पिढीकडे जात असते. त्यामुळे ही अंगठी वारसाहक्काने नेहाला मिळाली आहे. नेहा आणि अंगद हे एक वर्षापासून एकमेकांना ओळखत होते. त्यांच्या या मैत्रीविषयी नेहाच्या चाहत्यांना माहित नसले तरी दोघांच्याही घरातल्यांना माहित असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान नेहाच नाही, तर अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या लग्नादरम्यानही अशाच अंगठीची चर्चा रंगली होती. सोनमने घातलेली अंगठी तब्बल ९० लाख रुपयांच्या घरात होती. तसेच  अनुष्का आणि विराट कोहली यांच्याबाबतीतही असेच झाले होते. विराटने ऑस्ट्रेलियातील एका खास डिझायनरकडून अनुष्कासाठी अंगठी डिझाइन करुन घेतली होती.  त्यामुळे नेहाची ही अंगठी पाहता लग्नाच्या निमित्ताने सर्वाधिक महागड्या अंगठ्या घालणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत नेहाच्याही नावाचा समावेश झाला आहे, असं म्हणायला हरकत नाही.

मराठीतील सर्व Uncategorized ( Uncategorized ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Neha dhupia angad bedi wedding special story

Next Story
‘रेस ३’ मधल्या पहिल्या गाण्याचा टिझर पाहिलात का ?
फोटो गॅलरी