Combination  (जुळवणी) म्हणजे वस्तू अथवा व्यक्तीचे गट तयार करण्याची प्रक्रिया अथवा निवड होय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१) ११ खेळाडूंमधून ६ खेळाडूंची निवड करायची असेल तर ती निवड किती पद्धतींनी करता येईल?
१) ४४४ २) ४८६ ३) ४२६ ४) ४६२
स्पष्टीकरण : या ठिकाणी आपल्याला खेळाडूंची निवड करायची आहे. म्हणून  Combination  या पद्धतीचा वापर करावा.
वरील उदाहरणावरून n = 11 व r = 6

 

 

 

 

२) चित्रकलेच्या स्पध्रेसाठी उत्कृष्ट प्रकारचे चित्र काढणाऱ्या ८ मुलांच्या गटातून ५ मुलांची चित्रकलेच्या स्पध्रेसाठी निवड करायची आहे, तर अशी निवड किती पद्धतींनी करता येईल?
स्पष्टीकरण : या ठिकाणी आपल्याला उत्कृष्ट प्रकारचे चित्र काढणाऱ्यांची निवड करायची आहे. म्हणून  Combination  या पद्धतीचा वापर करावा.
वरील उदाहरणावरून n = 08 व r = 5

 

 

 

 

३) १० निळ्या व ८ पांढऱ्या चेंडूंमधून ५ निळे आणि ४ पांढरे चेंडू किती प्रकारे काढता येतील?

 

 

स्पष्टीकरण : १० निळ्या चेंडूंमधून ५ निळे चेंडू 10C5 इतक्या प्रकारे काढता येतील तसेच ८ पांढऱ्या चेंडूंमधून ४ पांढरे चेंडू  8C4  इतक्या प्रकारे काढता येतील,म्हणून

 

 

४) ६ विद्यार्थी व ५ विद्यार्थिनी यांच्या गटातून ५ सदस्यीय विद्यार्थी समिती स्थापन करायची आहे. ज्या कमिटीत ३ विद्यार्थी व २ विद्यार्थिनी असतील तर अशा किती पद्धतींनी विद्यार्थी समिती तयार करता येईल?
स्पष्टीकरण : ६ विद्यार्थ्यांमधून ३ विद्यार्थी 6C3 तसेच 5 विद्यार्थिनींपकी २ विद्यार्थिनी  5C2

 

 

 

 

म्हणून २०x१० = २०० पद्धतींनी समिती तयार करता येईल.

५) भारतीय संघासाठी ११ खेळाडूंमधून ६ खेळाडू निवडायचे आहेत, ज्यात महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा या तीन खेळाडूंचे स्थान प्रत्येक संघात निश्चित आहे तर असे किती संघ तयार होतील?
1) 56 2) 128 3) 28 4) 14
स्पष्टीकरण : ११ खेळाडूंचा जो संघ तयार करायचा आह, त्यात ३ खेळाडूंचे स्थान निश्चित केलेले आहे. त्यातील फक्त ८ (११-३) खेळाडू शिल्लक राहिले, तसेच या तीन खेळाडूंचे स्थान निश्चित असल्याने ६ खेळाडूंपैकी फक्त आता ३ खेळाडू शिल्लक राहिले आहेत. म्हणून खालीलप्रकारे संघ तयार करता येतील 8C3 
६) ६ बिंदुंपैकी ३ बिंदू सरळ नाहीत, तर अशा या ६ बिंदूंना जोडून किती सरळ रेषा तयार होतील?
1) 5 2) 10 3) 15 4) 20
स्पष्टीकरण : या उदाहरणात ३ बिंदू सरळ रेषेत नाहीत, म्हणजे थोडक्यात २ बिंदू जोडूनच सरळ रेषा तयार करता येईल म्हणून सरळ रेषांची संख्या = 6C2
 सरळ रेषा तयार होतील.
डॉ. जी. आर. पाटील – grpatil2020@gmail.com

मराठीतील सर्व उपक्रम बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc loksatta spardha guru march