वसई-विरारमधील विद्यार्थी हवालदिल; मुंबई, ठाणेप्रमाणे विशेष सुविधेची मागणी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई:  नोकरी आणि शिक्षणासाठी येण्यापूर्वी लसीकरण करणे परदेशात  बंधनकारक करण्यात आल्याने वसई-विरारमधील हजारो तरुण अडकून पडले आहेत. वसई विरार महापालिकेने अद्याप अशा तरुणांसाठी लसीकरण सुरू न केल्याने हे विद्यार्थी हवालदील झाले आहेत.  परदेशात जाणाऱ्यांसाठी जसे मुंबई, ठाण्यात  विशेष लसीकरण सुरू केले, तसे वसई-विरारमध्येही लसीकरण सुरू करावे, अशी मागणी पुढे येत आहे.

दरवर्षी वसई विरार मधून शेकडो तरुण विविध देशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेत असतात. या वर्षांच्या सुरुवातीला करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर विद्यार्थ्यांंनी परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतले होते. साधारण जून आणि जुलै महिन्यात शैक्षणिक वर्षांंना सुरवात होते. यावेळी भारतातून येणाऱ्या विद्यार्थ्यांंना लसीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु १८ ते ४४ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांंचे लसीकरण होत नसल्याने विद्यार्थ्यांंपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. लस मिळत नाही आणि दुसरीकडे शैक्षणिक वमहिला डॉक्टरचे धाडस, दोन चोरांना दिली एकाकी झुंर्ष सुरू झाल्याने विद्यार्थ्यांंची कोंडी होत आहे. १ मे रोजी शासनाने १८ ते ४४ वर्ष वयोगटासाठी लसीकरण सुरू केले होते. त्यावेळी मी प्रयत्न करून कोवीड अ‍ॅप मध्ये नोंदणी करून लशीची एक मात्रा घेतली होती. परदेशात कोविशील्ड लशीला मान्यता नाही. आता पुढे काय करायचे असा सवाल वसईत राहणाऱ्या सोफिया परेरा हिने केला आहे. मी कॅनडा मध्ये बिझनेस मॅनेजमेंट साठी प्रवेश घेतला आहे. लसींच्या दोन्ही मात्रा झाल्याशिवाय मला प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे माझे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ शकते अशी भीती तिने व्यक्त केली आहे. वसईतील ज्या विद्यार्थ्यांंनी परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतला आहे त्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे. मात्र लवकर लशी मिळाल्या नाहीत तर विद्यापीठांमधील प्रवेश रद्द होण्याची शक्यता आहे.

नोकरदार तरुणांच्या अडचणीत वाढ

वसईतील हजारो तरुण परदेशात नोकरीसाठी गेलेले होते. करोना आणि टाळेबंदीमुळे अनेक जण वसईत परतले आहेत. आता त्यांना पुन्हा परदेशात नोकरीसाठी जायचे आहे. त्यांनाही लशीची समस्या भेडसावत आहे. मिरा रोड येथे राहणारा सुशील शुक्ला हा मालवाहू जहाजावर अभियंता म्हणून काम करतो. टाळेबंदी शिथिल होताच तो पत्नीला भेटायला मिरा रोड येथे आला होता. आता त्याला पुन्हा जहाजावर जाण्यासाठी लस घेणे अनिवार्य केले आहे. मी जर पुन्हा कामावर गेलो नाही तर माझे मासिक वेतन बुडणार आहे. माझ्या घराचे हप्ते थकतील आणि सारं आर्थिक गणित कोलमडून पडेल, असे त्याने सांगितले. परदेशात नोकरी करणार्?या अनेकांची हीच समस्या निर्माण झाली आहे.

परदेशातील विद्यार्थ्यांंसाठी लसीकरण सुरू करणे हा धोरणात्मक निर्णय आहे. मुंबई आणि ठाण्यात ज्या प्रकारे या विद्यार्थ्यांंसाठी लसीकरण सुरू झाले आहे, त्याप्रमाण शहरतील विद्यार्थ्यांंसाठीही लसीकरण करण्यात येईल

-किशोर गवस, उपायुक्त (आरोग्य), वसई-विरार महापालिका

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Affordability of students going abroad for education due to lack of vaccines ssh