भाईंदर : शिवसेना ठाकरे गटाच्या दोन महिला पदाधिकाऱ्यांमध्ये भर रस्त्यात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.याबाबतची चित्रफीत समाज माध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे.

बदलापूर येथे अल्पवयीन मुलींवर शाळेत झालेल्या लैगिक अत्याचाराचे तीव्र पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. यात सामाजिक संस्थासह राजकीय पक्षाकडून देखील आंदोलन करून आपला निषेध नोंदवला जात आहे. बुधवारी या संदर्भात मिरा भाईंदर शिवसेना ( ठाकरे ) गटाकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी शहरभरातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा…नालासोपार्‍याच्या शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरण, एसआयटी चौकशी करण्याची मागणी

मात्र या प्रसंगी महिला जिल्हा संघटक स्नेहल सावंत-कंसारिया आणि युवती सेनेच्या विधानसभा अधिकारी आकांशा विरकर यात वाद झाल्याची घटना घडली. यात शाब्दिक वाद सुरू असतानाच आकांक्षा विरकर यांनी स्नेहल सावंत यांच्या तोंडावर बुक्का मारल्याचे दिसून आले. हा प्रसंग मोबाईल कॅमेरात कैद झाला असून समाज माध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोघांमध्ये काही जुने वाद असून अजून-मधून भांडण होण्याचे असे प्रकार घडत असतात.