वसई : नालासोपारा पूर्वेच्या शंकेश्वरनगर मधील एका इमारतीत परफ्युमवरील तारखा बदलण्याचे काम सुरू असताना स्फोट झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास ही घटना घडली यात एकाच कुटुंबातील चार जण होरपळून जखमी झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नालासोपारा पूर्वेच्या शंकेश्वर नगर परीसर आहे. या ठिकाणी असलेल्या रोशनी अपार्टमेंट इमारतीत मधील ११२ क्रमांच्या सदनिकेत वडर कुटुंब राहते. गुरुवारी रात्रीच्या सुमारास परफ्युम बॉटल वरील तारखा संपल्या होत्या. त्या बदलण्याचे काम सुरू होते. याच दरम्यान अचानकपणे स्फोट झाला. परफ्युम मध्ये असलेल्या गॅसमुळे स्फोटात घरातील चार जण होरपळून जखमी झाले.

हेही वाचा…मराठी विश्वकोशाचे खंड अद्ययावत होणार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; नवे शब्द, नोंदीची भर

यात महावीर वडर( ४१)सुनीता वडर, हर्षवर्धन वडर(९), हर्षदा वडर(१४) अशी जखमींची नावे आहे. या घटनेची माहिती पालिकेच्या अग्निशमन विभागाला मिळताच घटनास्थळी पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणली. तर जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. मुलगा हर्षवर्धन याच्यावर नालासोपारा येथील लाईफ केयर रुग्णालय तर अन्य तीन जणांवर ओस्कर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explosion occurred in shankeshwarnagar nalasopara east during perfume date changing work sud 02