सातारा : मराठी विश्वकोशाचे १ ते २० खंड आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कालानुरूप अद्ययावत केले जाणार आहेत. यामध्ये नवीन शब्दांची भर घालणे, पूर्वीच्या शब्दांसाठीच्या सुटलेल्या नोंदी, चित्रांची जोड देणे आदी कामे केली जाणार असून, या खंडांची ही दुसरी आवृत्ती वर्षभरात प्रकाशित केली जाणार असल्याचे विश्वकोशाचे प्रमुख संपादक डॉ. रवींद्र शोभणे यांनी सांगितले.

मराठी विश्वकोशाच्या नवीन संपादक मंडळाची पहिली बैठक विश्वकोशाचे प्रमुख संपादक व अध्यक्ष डॉ. शोभणे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. यानंतर त्यांची भेट घेतली असता नवीन प्रकल्पांविषयीची माहिती त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

Aaditya Thackeray On Mumbai University Senate Election 2024
Maharashtra Breaking News : ठाकरे गटाच्या देवेंद्र फडणवीसांशी भेटीगाठी वाढल्या? यामागे नेमकं काय? आदित्य ठाकरे म्हणाले…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
spread of bogus research papers The proposed regulations mention the UGC Care List pune news
बोगस संशोधनपत्रिकांचे पुन्हा पेव? प्रस्तावित नियमावलीत ‘यूजीसी केअर लिस्ट’चा अनुल्लेख
air Shivajinagar , Shivajinagar air bad , mumbai ,
मुंबई : सलग दुसऱ्या दिवशी शिवाजीनगरची हवा ‘वाईट’, परिसरावार मॉनिटरिंग व्हॅनची नजर
33 Bangladeshi infiltrators arrest in Pimpri-Chinchwad in year
पिंपरी- चिंचवडमध्ये वर्षभरात ३३ घुसखोर बांगलादेशी, रोहिंग्याना पकडले; सर्वाधिक बांगलादेशी भोसरीमध्ये!
Rambhau Mhalgi lecture series starts on Wednesday January 8
ठाण्यात उद्यापासून रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेला सुरूवात
Manoj Jarange Patil on Dhananjay Munde
Maharashtra News: ‘धनंजय मुंडे जातीय तेढ निर्माण करत आहेत’ जरांगे पाटील
Devendra fadnavis loksatta news
धर्मसत्तेच्या जनजागृतीतून नवी राजसत्ता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हेही वाचा…“जमत नसेल तर स्पष्ट सांगा”, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून अजित पवारांचा पोलिसांवर संताप; गृहमंत्री फडणवीस म्हणाले…

अधिकाधिक विषयांचा सहभाग विश्वकोशात यावा, माहितीचे विकेंद्रीकरण व्हावे यासाठी विश्वकोशाची ज्ञानमंडळे पुनर्जीवित करण्यात येणार असल्याचे या वेळी ठरवण्यात आल्याचे सांगत डॉ. शोभणे म्हणाले, की जागतिक बदल, उदारीकरण, खासगीकरण असे अनेक नवीन शब्द किंवा त्यांच्याविषयीच्या नोंदी या पहिल्या आवृत्तीत नाहीत. या शब्द किंवा सोबतच्या नोंदीची भर या नव्या आवृत्तीत घातली जाणार आहे. कुमार विश्वकोशाचा पहिला आणि दुसरा खंड यापूर्वी प्रकाशित झाला आहे. तिसरा आणि चौथा खंड संकेतस्थळावर प्रकाशित झाला आहे. हे दोन्ही खंड ग्रंथरूपात प्रकाशित केले जातील. विश्वकोशाच्या कामाची गती इतरांना संथ वाटत असली तरी आवश्यक त्या गतीने विश्वकोशाचे काम सुरू आहे. नव्याने अद्ययावत होणारे विश्वकोशाचे खंड प्रकाशनात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी दिलेल्या मार्गाचा वापर करून कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत अथवा निर्दोष पद्धतीने वाचकांकडे जावा, यासाठी कटाक्ष पाळला जात आहे.

विश्वकोशाच्या कामासंबंधी माहिती पुस्तक प्रकाशित केले जाणार आहे. स्पर्धा परीक्षांसाठी विश्वकोश ग्राह्य धरला जातो. यातील तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मागणीप्रमाणे त्यांना विश्वकोशाची माहिती या स्वतंत्र पुस्तिकेद्वारे पोहोचविली जाणार आहे. विश्वकोशात नवनवीन नोंदी येण्यासाठी व जास्तीत जास्त विद्वानांचा सहभाग मिळवण्यासाठी नोंद लेखकांची कार्यशाळा घेतली जाणार आहे.

नव्या विश्वकोशात जागतिकीकरण, खासगीकरण, विज्ञान, अर्थशास्त्र, गणित, पर्यावरण, संस्कृत, तत्त्वज्ञान, मानव्य शास्त्र, माहिती तंत्रज्ञान आदी विषयांच्या अद्यावत नोंदी विश्वकोशात आलेल्या आहेत. त्या आता अद्ययावत केल्या जातील. शासनस्तरावर आणि उच्च, सर्वोच्च न्यायालयात विश्वकोशातील नोंदींना अत्यंत महत्त्व असल्याने व त्या प्रमाण मानल्या जात असल्याने त्या निर्दोष करण्याचा प्रयत्न असणार आहे. विश्वकोशाचा पहिला एक हजार पानांचा मूळ खंड नवीन नोंदीमुळे साडेअकराशे पानांचा होईल. प्रमुख संपादकांनंतरची विभाग संपादक, उपसंपादक, विद्या व्यासंगी, संपादक सहायक यांची रिक्त पदे भरली जाणार आहेत. ‘गुगल’वर विश्वकोशाचे सर्व खंड उपलब्ध असून, नवीन सात हजार नोंदी ही त्यावर अद्ययावत केल्या आहेत.

हेही वाचा…कोकणातील निर्मनुष्य बेटे आणि किल्ल्यांवर २६ जानेवारीला ध्वजारोहण होणार

मराठी विश्वकोशाचे जनक तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे १२५ वे जन्मशताब्दी वर्ष यंदा साजरे होत आहे. मराठी विश्वकोश महामंडळाकडून अद्याप कार्यक्रम नियोजन ठरलेले नसले तरी संपादक मंडळाकडून याचा विचार सुरू असल्याचे डॉ. शोभणे यांनी सांगितले. या बैठकीला १८ सदस्य उपस्थित होते. उपाध्यक्ष केशव उपाध्ये आणि आनंद दीक्षित यांनी संपादक मंडळात सहभागी होण्याबाबत असमर्थता दर्शविली आहे. विश्वास पाटील, मिलिंद वाटवे, प्राजक्त देशमुख हे तीन सदस्य वैयक्तिक कारणामुळे अनुपस्थित होते.

नवे विषय, नवे खंड

विश्वकोश महामंडळाकडून ऑलिंपिक विश्वकोश खंड विचाराधीन आहे. यासाठी क्रीडा क्षेत्रातील अभ्यासक, तज्ज्ञ, मान्यवरांची मदत घेतली जाणार आहे. याशिवाय बाल विश्वकोशाचा प्रकल्प विचाराधीन आहे. संकल्पीय खंड प्रकाशित केला जाणार आहे. याशिवाय विश्वकोश मंडळाने विश्वकोशाचा सूची खंडही तयार केला आहे. त्यामुळे विश्वकोशाच्या कुठल्या खंडात कुठली माहिती आहे, याची माहिती उपलब्ध होईल.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शासनाने पुनर्विचार समिती स्थापन केली होती. या समितीपुढे इतर भारतीय अभिजात भाषांचा अभ्यास करून तसे संदर्भीय पुरावे मराठी विश्वकोशाने पुरविले आहेत. मराठी भाषा ही विद्वत्तापूर्ण भाषा असल्याने या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही सर्वसामान्यांपासून विद्वानांपर्यंत आनंदाचीच बाब आहे. डॉ. रवींद्र शोभणे

Story img Loader