Shraddha Murder Case : श्रद्धाच्या 'त्या' अर्जावर पोलिसांनी केली २६ दिवस चौकशी, श्रद्धाने अर्ज मागे घेतल्याचा पोलिसांचा दावा | Shraddha Murder Case: After Shraddha`s application Police was investigated her and Aftab for 26 days | Loksatta

Shraddha Murder Case : श्रद्धाच्या ‘त्या’ अर्जावर पोलिसांनी केली २६ दिवस चौकशी, श्रद्धाने अर्ज मागे घेतल्याचा पोलिसांचा दावा

श्रद्धा आणि आफताब या दोघांनी परस्पर संमतीने समझोता केला होता. त्यामुळे हा अर्ज दप्तरी करण्यात आला होता, अशी माहिती परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी दिली.

Shraddha Murder Case: After Shraddha`s application Police was investigated her and Aftab for 26 days

वसई : ‘माझ्या जीवाला आफताबपासून धोका आहे. तो माझी हत्या करून करू शकतो अशी लेखी तक्रार श्रद्धा वालकरने २३ नोव्हेंबर २०२० रोजी तुळींज पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रार अर्जावर पोलिसांनी २६ दिवस चौकशी केली होती. मात्र आफताब आणि श्रद्धा यांनी आपापसात समझोता केल्याने हा तक्रार अर्ज निकाली काढण्यात आला अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा… Shraddha Murder Case : दोन वर्षांपूर्वीच श्रद्धाने आफताबाबत व्यक्त केली होती ‘ही’ भिती; पोलीस ठाण्यात दिलेल्या अर्जात म्हणाली…

आफताब श्रद्धाला मारहाण करायचा. नोव्हेंबर २०२० रोजी आफताबला बेदम मारहाण केली होती. यामुळे ती तीन दिवस रुग्णालयात उपचारासाठी दाखल होती. या मारहाणीनंतर २३ नोव्हेंबर २०२० रोजी श्रद्धा ने नालासोपारा येथील तुळींज पोलीस ठाण्यात एक तक्रार अर्ज दिला होता. आफताब माझी हत्या करून माझ्या शरीराचे तुकडे करून फेकणार आहे, असे या तक्रारीत स्पष्ट लिहिले होते. हा अर्ज दिल्ली पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामुळे तकार असूनही पोलिसांनी कारवाई का केली नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हेही वाचा… ‘I Have Got News’, श्रद्धाचं शेवटचं चॅट आलं समोर, मृत्यूच्या काही तास आधीच मित्राला पाठवला होता मेसेज

पोलिसांनी हा आरोप फेटाळून लावला आहे… श्रद्धा ने अर्ज दिल्यानंतर आम्ही २६ दिवस त्याची चौकशी करत होतो… दोन वेळा आमचे अधिकारी श्रद्धा आणि आफताबच्या घरी जाऊन आले होते. दोघांना पोलीस ठाण्यामध्ये बोलावून त्यांची चौकशी करण्यात आली होती. मात्र श्रद्धा आणि आफताब यांच्यामध्ये समझोता झाल्याने हा अर्ज २६ दिवसांनी निकाली काढण्यात आला अशी माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली.

हेही वाचा… Shraddha Murder Case: हा खरंच आफताब आहे? श्रद्धाच्या मारेकऱ्याचा FSL ऑफिसमधून बाहेर पडतानाचा व्हिडिओ व्हायरल!

श्रद्धा आणि आफताब या दोघांनी परस्पर संमतीने समझोता केला होता. त्यामुळे हा अर्ज दप्तरी करण्यात आला होता, अशी माहिती परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी दिली.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-11-2022 at 14:30 IST
Next Story
Shraddha Murder Case : दोन वर्षांपूर्वीच श्रद्धाने आफताबाबत व्यक्त केली होती ‘ही’ भिती; पोलीस ठाण्यात दिलेल्या अर्जात म्हणाली…