वसई: पश्चिम रेल्वेवरील भाईंदर खाडी पुलाजवळ लोकलमधून पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी दुपारी अडीच  वाजताच्या सुमारास घडली आहे. विमल सुपेवार (५३) असे या मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

दररोज पश्चिम रेल्वेने विरार ते चर्चगेट असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. लोकलच्या वेळेतील अनियमितता, सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत असणारी गर्दी यामुळे नागरिकांवर लोकलच्या दारात लटकून, धोकादायक प्रवास करण्याची वेळ अनेकदा ओढवते. तसेच विरार चर्चगेट रेल्वे मार्गावर यामुळे लोकलमधून पडून अनेक प्रवासी जखमी झाल्याच्या, तर काही जण मृत्युमुखी पडल्याच्या घटना सातत्याने घडताना दिसतात.

सोमवार दुपारी अडीच वाजताच्या सुमारास अशीच एक रेल्वे अपघातची भाईंदर स्थानकाजवळ घडली. विरार ते चर्चगेट दिशेने जाणाऱ्या धावत्या लोकल मधून पडून महिलेचा मृत्यू  झाला. विमल सुपेवार (५३) असे या महिलेचे नाव असून ती कांदिवली येथे राहणारी आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान डांगे यांनी दिली आहे  तसेच या घटनेचा तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.