राज्यात शिवसेनेची सुप्त लाट असून, आज ती बाहेर पडली असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले. उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये कुटुंबीयांसमवेत बुधवारी सकाळी मतदान केले. मतदानानंतर त्यांनी शिवसेनेचे पूर्ण बहुमताचेच सरकार राज्यात सत्तेवर येईल, असा दावा केला.
लोकशाही पद्धतीमध्ये सर्वसामान्य जनता सर्वशक्तीमान असते, असे सांगून ते म्हणाले, शिवसेनेची सुप्त लाट असल्याचे मला राज्यात प्रचार दौऱयावेळी जाणवले. तीच लाट आज मतदानासाठी बाहेर पडली आहे. बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसांसाठी आपले रक्त आटवले. याचा मतदार नक्की विचार करतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आपल्या मनात पूर्ण आदर असल्याचे सांगून त्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही सुद्धा मोदींचा प्रचार केला होता. मात्र, भाजपने त्यावेळी आमचा वापर करून घेतला आणि आता युती तोडून आम्हाला दूर केले, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
प्रचारासाठी राज्यात फिरत असताना जनता मला मुख्यमंत्री होण्यासाठी साद घालत होती. त्याचाच विचार करून आपण मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 15th Oct 2014 रोजी प्रकाशित
राज्यात शिवसेनेचीच लाट – उद्धव ठाकरे
राज्यात शिवसेनेची सुप्त लाट असून, आज ती बाहेर पडली असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले.

First published on: 15-10-2014 at 12:21 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena will establish govt in maharashtra predicts uddhav thackeray