agran dhulgaon pattern in maize production zws 70 | Loksatta

मका उत्पादनातील  ‘अग्रण धुळगाव’ पॅटर्न

ऊस, द्राक्ष, केळी, डाळिंब या नगदी पिकांबरोबरच आता मका पिकालाही नगदी पिकाचा दर्जा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत

मका उत्पादनातील  ‘अग्रण धुळगाव’ पॅटर्न
(संग्रहित छायाचित्र)

दिगंबर शिंदे

ऊस, द्राक्ष, केळी, डाळिंब या नगदी पिकाबरोबरच आता मका पिकालाही नगदी पिकाचा दर्जा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. चार महिन्याच्या अवधीमध्ये या पिकाची लागवड करून एकरी लाख ते सव्वा लाखाचे उत्पन्न मिळण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाच्या सल्ल्याने कवठेमहांकाळ तालुक्यातील अग्रण धुळगाव हे ‘मका हब’ म्हणून गणले जात आहे.

ऊस, द्राक्ष, केळी, डाळिंब या नगदी पिकांबरोबरच आता मका पिकालाही नगदी पिकाचा दर्जा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. चार महिन्यांच्या अवधीमध्ये या पिकाची लागवड करून एकरी लाख ते सव्वा लाखाचे उत्पन्न मिळण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाच्या सल्ल्याने तालुक्यातील अग्रण धुळगाव हे ‘मका हब’ म्हणून गणले जात आहे.

अग्रण धुळगाव कवठेमहांकाळ तालुक्याच्या पूर्वेकडे ८ किलोमीटरवर असणारे गाव. गावचे भौगोलिक क्षेत्र १ हजार ८०९.८८ हेक्टर असले तरी प्रत्यक्ष वहिवाटीखालील क्षेत्र १ हजार ५८९ हेक्टर इतके आहे. गावाची ओळख २०१८ पर्यंत दुष्काळी भाग अशीच होती. दरवर्षी अगदी ऑक्टोबर महिन्यापासून जून महिन्यापर्यंत पिण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा होत होता. त्यानंतर २०१९ अग्रणी नदी पुनर्जीवित झाल्यानंतर हळूहळू थोडाफार बदल होत गेला. सन २०२० पर्यंत मका पिकाचे उत्पादन एकरी २० क्विंटल इतके होते. त्यामुळे मका पिकामध्ये कितीही कष्ट घेतले तरी जास्तीत जास्त एकरी २५ ते ३० क्विंटल उत्पादन मिळू शकते असा लोकांचा गैरसमज निर्माण झाला होता.

मका पीक पद्धतीत झालेला आमूलाग्र बदल

जून २०२० रोजी कृषी सहाय्यक जी. ए. अजेटराव हे अग्रण जळगाव या ठिकाणी रुजू झाल्यानंतर त्यांनी गावचा वातावरणाबरोबरच भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केला. उपविभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार वेताळ आणि तालुका कृषी अधिकारी एम.जे. तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एकरी ६० क्विंटल मका उत्पादन घेण्यासाठी जून २०२१ मध्ये रणनीती आखण्यात आली. त्यासाठी सुरुवातीला शेतकरी निवड करीत असताना स्वत:मध्ये आत्मविश्वास असणारे आणि सुविधा उपलब्ध असलेल्या १० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली.

त्यानंतर जास्त उत्पादन देणाऱ्या बियाण्याची निवड करण्यात आली. पेरणी अंतर ६० बाय २० सेमी ठेवून पेरणी करण्याअगोदर बियाणास विटावॅयस पावर या बुरशीनाशकांची, गावचौ या कीटकनाशकाची आणि अझोटोबॅयटरची बीज प्रक्रिया करून जूनच्या पहिल्या आठवडय़ात पेरणी करण्यात आली. पेरणी करत असताना १०: २६ : २६ हे खत १०८ किलो, झींक सल्फेट १० किलो, आणि युरिया ३ किलो ही खते देण्यात आली. पेरणीनंतर ७२ तासाच्या आत एट्राझीन या तणनाशकाची फवारणी केली.

खत व पाणी व्यवस्थापन

मका पीक ४ पानावर असताना एकरी ३३ किलो युरिया, मका पिक ८ पानावर असताना एकरी ४० किलो युरिया, पीक तुरा अवस्थेत असताना एकरी २७ किलो युरिया आणि दाणे भरत असताना एकरी ७ किलो युरिया देण्यात आला. खत दिल्यानंतर पाठोपाठ पाणी देण्यात आले.

किड व रोग व्यवस्थापन

पेरणीनंतर लष्करी अळी नियंत्रणासाठी एकरी ४ कामगंध सापळे लावण्यात आले. तसेच लष्करी अळीच्या पतंगाचा अटकाव करण्यासाठी बांधावर नेपियर गवताची लागवड करण्यात आली. मका पीक दोन ते तीन पानावर असताना पाच टक्के िनबोळी अर्काची फवारणी केली पीक चार ते पाच पानावर असताना निंबोळी अर्क व यलोरोपायरीफॉस आणि सायपरमेथ्रींची फवारणी करण्यात आली. पीक दहा ते बारा पानावर असताना इमामेयिटन बेंजोएट चे फवारणी करण्यात आली. या दरम्यान दर पंधरा दिवसांनी अंडा अमिनो अ‍ॅसिड या संजीवकाची २ वेळा फवारणी केल्यामुळे पानांचा आकार तसेच रोपाची वाढ अतिशय चांगल्या पद्धतीने झाली.

अशा पद्धतीने सुयोग्य नियोजन केल्यामुळे १० पैकी संभाजी तातोबा खंडागळे या शेतकऱ्याचे उत्पादन एकरी ५९ क्विंटल इतके आले तसेच ६ शेतकऱ्यांचे उत्पादन एकरी ५० क्विंटलपर्यंत आणि ३ शेतकऱ्यांनी एकरी ४५ क्विंटलपर्यंत मजल मारली. त्यामुळे जर मका उत्पादन वाढीच्या सूत्रांचा योग्य पद्धतीने अवलंब केला तर एकरी ६० क्विंटलपर्यंतचा टप्पा पार करणे सहज शक्य आहे. असा आत्मविश्वास कृषी सहाय्यक जी.ए.अजेटराव यांनी शेतकऱ्यांच्या मध्ये निर्माण केला.

विक्री व्यवस्थापन

सांगली जिल्ह्यात फूड इंडस्ट्रीसाठी मका खरेदी करणारे व्यापाऱ्यांची मागणी ही ५० हजार टनाची आहे. आणि ही गरज भागवण्यासाठी बाहेरील राज्यातून म्हणजे कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या राज्यातून मका खरेदी केला जातो. परंतु जर एकाच वाणाचा, रंग, आकार आणि गुणवत्तेचा मका मोठय़ा प्रमाणावर एकाच गावातून मिळणार असल्यामुळे जिल्ह्यातील फूड इंडस्ट्रीसाठी काम करणारे व्यापाऱ्यांचे लक्ष अग्रण धुळगावकडे लागले आहे. जर अशा प्रकारची ५०० एकर क्षेत्रावरील मका एकाच ठिकाणावरून मिळणार असेल तर हे व्यापारी जादा दराने मका स्वीकारण्यास तयार आहेत.

जर शेतकऱ्याचे एकरी ५० क्विंटल उत्पादन आले आणि दर किमान २५ रुपये मिळाला तरी शेतकऱ्यास चार महिन्यात १ लाख २५ हजार रुपये मिळू शकतात त्यामुळे उसापेक्षा परवडणारे पीक म्हणून मका पिकाकडे शेतकरी पाहत आहेत. यासाठी कृषी विभाग शेतकर्याना प्रोत्साहण करीत आहेत. – मनोजकुमार वेताळ, उपविभागीय कृषी अधिकारी.

वातावरणातील बदल आणि बाजारातील चढउतार यामुळे द्राक्ष, डाळिंब, केळीची शेती बेभरवशाचे होत आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणूक करूनही पिकलेले पीक पदरात पडते की नाही याची शाश्वती नसल्याने हमखास उत्पन्न देणाऱ्या मका पिकाची लागवड फायदेशीर ठरणारी आहे. – संभाजी खंडागळे, शेतकरी

digambar.shinde@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष ( Vishesh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
चावडी : दादांचा दौरा.. अळणी वरणासारखा

संबंधित बातम्या

खासदारांची खंत

व्हिडिओ

ताज्या बातम्या
आरपीआयचे माजी जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांना अटक
Video : मेहंदी रंगली गं…!! वधूचा फोटो ते सप्तपदी, अक्षया देवधरच्या सुरेख मेहंदीचा व्हिडीओ समोर
CM शिंदेंची शिवरायांशी तुलना करणाऱ्या मंगलप्रभात लोढांविरुद्ध संभाजी ब्रिगेड आक्रमक; म्हणाले, “मूग गिळून…”
Gujarat Election: “मोदी गेले म्हणजे…”; रवींद्र जडेजानं शेअर केला बाळासाहेब ठाकरेंचा VIDEO
विश्लेषण: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ चर्चेत का?