मारण्याइतका द्वेष निर्माण व्हावा असे कोणते काम दाभोलकर आणि पानसरे यांनी केले? गेल्या दोन-चार वर्षांतील एकापाठोपाठ एक घडणाऱ्या अनेक घटना भयंकारी सामाजिक शक्तींचा व म्हणून समाजद्रोही, विघटनवादी व हुकूमशाही राजकारणाचा उदय व विस्तार दर्शवतात, ही चिंतेची बाब आहे..
विकृती आणि अश्लीलता या दोन्ही गोष्टी मला महत्त्वाच्याच वाटतात, कारण त्यांच्यामुळेच समाजस्थितीचे भान येण्यास मदत होते. कार्ल मार्क्स यांच्या एका लेखात ‘(सामाजिक) ऱ्हास किंवा
त्यामुळेच कॉ. पानसरे यांच्या मृत्यूच्या बातमीनंतर सुन्न झालेल्या माझ्या मनात एका विकृत किंवा अश्लील गाण्याच्या ओळी पुन:पुन्हा का गुणगुणल्या जात आहेत, याचे प्रथम मला आश्चर्य व नंतर भीती वाटू लागली. १९४३-४४ च्या सुमारास नाझी जर्मनीविरुद्ध लढणाऱ्या ब्रिटिश व त्यांच्या मित्रराष्ट्रातील तरुण सैनिकांचे ते ‘मार्चिग’ गाणे होते. ‘हिटलर हॅज वन बॉल, हिमलर हॅज टू बट व्हेरी स्मॉल, अॅण्ड गोबेल्स हॅज नो बॉल्स अॅट ऑल’ अशा ओळी असलेले ते गाणे होते. कॉ. पानसरेंच्या विकृत हत्येनंतर हे गाणे माझ्या ओठावर का रेंगाळावे? आज इतक्या अनेक वर्षांनी ते का आठवावे? हिटलर, हिमलर, ओरिंग्ज, गोबेल्स यांची अशी व इतकी विद्रूप आठवण का व्हावी? हे व असे अनेक प्रश्न मनात आले.
कॉ. पानसरे महाराष्ट्राला वादळी, उग्र किंवा तापट, आग्रही म्हणून नव्हे, तर शांत, संयमी, सत्याग्रही, डाव्या तत्त्वज्ञानाची कास धरून विनयाने व दृढतेने बदलाच्या चळवळीत व गोरगरीब पिचलेल्या वर्गाच्या जीवनात भौतिक व अभौतिक बदल व्हावेत म्हणून प्रयत्न करणारे असेच माहीत होते. वयाची ऐंशी वर्षे पार केलेल्या या वृद्ध कॉम्रेडवर गोळ्यांचा वर्षांव करून त्याला रक्ताच्या थारोळ्यात तडफडताना पाहण्याचा आनंद कोणाला व कसा होतो?
पिळवणुकीला त्यांचा विरोध होता, भांडवलशाहीला त्यांनी शत्रू मानले, प्रखर कडव्या हिंदुवादाला त्यांचा
विकृतीचे एक शास्त्र असते, असे लेराईपासून मार्क्सवादी प्रख्यात जनन/ अनुवंश शास्त्रज्ञ रिचर्ड लेव्होटिन यांनी आपल्याला मागेच सांगितले आहे. लेव्होटिनने वारंवार उल्लेखिलेल्या ‘परवेसिव्ह एर्र’ या संकल्पनेची आठवण महाराष्ट्रातील व देशातील पानसरे-दाभोलकर खून सत्रानंतर विशेष प्रकर्षांने येते. विकृत कृती आणि त्या कृतीतून निर्माण झालेल्या अश्लीलतेचा आनंद घेण्याची वृत्ती सामाजिक सौंदर्यानुभवाचा भाग बनणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. चिंता आहे ती नव्याने स्थापित होत जाणाऱ्या सौंदर्यशास्त्राची. गेल्या दोन-चार वर्षांतील एकापाठोपाठ एक घडणाऱ्या अनेक घटना अशा भयंकारी सामाजिक शक्तींचा व म्हणून समाजद्रोही, विघटनवादी व हुकूमशाही राजकारणाचा उदय व विस्तार दर्शवतात, ही चिंतेची बाब आहे.
गुजरातमधील दंगलग्रस्तांच्या प्रश्नांची तड लावू पाहणाऱ्या तिस्ता सेटलवाड यांचा छळ आणि पुणे-कोल्हापूरमधला गोळीबार यांचा परस्परसंबंध हा वर सांगितलेल्या सौंदर्यानुभवाचाच भाग आहे. अमर्त्य सेन यांना नालंदा विद्यापीठाच्या कुलपती पदावर घुसमटवणे हा नाझी गॅस चेंबरमधील धुराचा भाग नव्हे काय? अनंतमूर्ती यांच्या निधनानंतर फटाके उडवून आनंद साजरा करणे हा याच सौंदर्यशास्त्राचा पाया नव्हे काय? इशरतजहाँ किंवा तशाच खटल्यातील निरपराधांवर गोळ्या चालवणाऱ्यांना खुलेआम जामीन मिळणे, त्यांचे जाहीर सत्कार होणे, हा कुठल्या आनंदाचा ठेवा? खून, जातीय दंगली आणि असेच आरोप असलेल्या व्यक्तींचे न्यायालयीन खटले बदलणे, त्यांचे न्यायमूर्ती बदलणे, एवढेच नव्हे तर, त्यांची राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षपदी नेमणूक करून गावोगावी, नाक्यानाक्यांवर, रस्तोरस्ती, टीव्हीच्या स्क्रीनवर किंवा वृत्तपत्रांच्या पानांवर जेव्हा त्यांचे चेहरे मिरवले जातात, पुजले जातात, तेव्हा काय चांगले नि काय वाईट हे ठरवणारे समाजनीतिमत्तेचे शास्त्र किंवा ज्याला मी सौंदर्यशास्त्र- ई२३ँी३्रू२ म्हणतो त्याचे कसे तीनतेरा वाजतात हे आपल्याला समजत नाही काय? अदानी, अंबानी यांच्या विमानात बसून जेव्हा बॉलीवूड नायक त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलतो तेव्हा कोणत्या नाटकाची संहिता लिहिली जाते हे न समजण्यासारखे आहे काय? पुष्पक विमानाचे किंवा गणपतीच्या शिराचे जेव्हा वैज्ञानिकीकरण होते, मगरींशी झुंजणाऱ्या व मंदिरावर भगवा फडकवणाऱ्या बाल नरेंद्राची कथा जेव्हा बालसाहित्याचा भाग बनते, सेन्सॉर बोर्डाचे नवे नियम जेव्हा काय चांगले नि काय वाईट याची गणिते मांडू लागतात, तेव्हा तेव्हा पानसरे-दाभोलकर हत्याकांडातील हिंसेला कारण मिळते हे विसरून कसे चालेल?
कोणी सोप्यागोम्या व्यापारी लक्षावधी रुपयांचा सूट पंतप्रधानांना भेट देतो, प्रधानसेवक अशा महागडय़ा भेटी नुसत्या स्वीकारतच नाहीत, तर महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात त्या परिधान करतो, तेव्हा कोणता संदेश शासनयंत्रणेला व सर्वसामान्य जनतेला मिळतो? पैसा व तो कोणाचाही कोणत्याही मार्गाने मिळवलेला पैसा म्हणजेच विकास, म्हणजेच सौंदर्य, अशी व्याख्या त्यामुळे रूढ झाली तर नवल ते काय? अशा सुटाचा लिलाव कोटय़वधी रुपये मोजून त्याची जाहिरातबाजी करून केला जातो, तेव्हा या धनदांडग्या संस्कृतीच्या जयजयकाराची उन्मत्त बीजे रोवली जात नाहीत काय? रशियन तेलमाफियांच्या राजकारणाचा नायक पंतप्रधान पुतिन यांचे सैबेरियातील हंसपक्षी वाचवण्याचे कार्यक्रम, सुटाच्या लिलावातून गंगा स्वच्छता अभियान किंवा गल्लोगल्ली पसरलेल्या गुंड- दादागिरीच्या अड्डय़ांच्या मालकांनी सार्वजनिक गणेश उत्सव साजरे करून गरीब विद्यार्थ्यांना वाटलेली पुस्तके किंवा तत्सम कार्यक्रम या व अशा अनेक कार्यक्रमांचे सौंदर्यशास्त्र किंवा राजकारण कोणाचे भले करणार याबरोबरच कोणत्या हिंसाचाराचे कसे समर्थन करणार, असा प्रश्न आपल्याला पडणारच नाही काय? बेजबाबदार युनियन कार्बाइडच्या मालकाने सुंदर उद्यान घडवले होते व त्याची बाग हा चर्चेचा विषय होता. कदाचित सुंदर चित्रांचे किंवा प्राचीन कलाकृतींचे त्याचे खासगी संग्रहालयही असू शकेल. हिटलर चित्रे काढीत असे व त्याचा चित्रसंग्रह मोठा होता, ही व अशी उदाहरणे कमी नाहीत.
लोकमान्य चौकटीत, लांबून सुंदर व नयनरम्य दिसावे अशी योजना करून जेव्हा चौकटीतले चित्र चतुराईने बदलले जाते तेव्हा अनेक वेळा ते लक्षात येणे कठीण असते. जसजसे ते बदलले जाते व जसजसा बदल हा सवयीचा व म्हणून दैनंदिन व्यवहाराचा भाग बनतो तसतसा धनदांडग्यांच्या बेबंद निर्लज्जपणाला सामाजिक प्रतिष्ठा मिळते. पानसरे-दाभोलकरांचे अजून वाहणारे रक्त असो किंवा अमर्त्य सेन वा तिस्ताचा कोंडलेला श्वास असो, त्या त्या रक्ताच्या थेंबाला वा गुदमरलेल्या श्वासाला आपल्या कॅनव्हासवर आपण कसे, कोठे आणि किती बघणार यावरच त्यांचे खुनी किती, कोण व कोठे याची उत्तरे ठरणार आहेत.
*लेखक चित्रकार, कलाचिंतक आणि नवतत्त्वज्ञानाचे अभ्यासक आहेत.