गार्गी
त्याचप्रमाणे ’भिंतीवरील फोटो’ अनिल जावकर, ‘एकेकाचे फंडे’ सुधीर सुखठणकर, ‘रेड सिग्नल’ अजय जयवंत, ‘धडा’ मंगला गोडबोले, ‘आभास हा ’ शुभदा साने यांच्या कथा वाचनिय आहेत. ‘मराठी महिला माऊंट एव्हरेस्टवर’ हे कॅ.प्राची गोळे तनेजा हिची आणि तिच्या समूहाची चित्तथरारक एव्हरेस्ट मोहीमेचे प्रासंगिक चित्रण या अंकात करण्यात आले आहे. २०१२ मध्ये दिवाळी अंकाने घेतलेल्या कथा स्पर्धेतील उत्कृष्ट पाच कथांचा या अंकात समावेश आहे. सुनील सरमळकर, दिगंबर जोशी, बाळ बागवे, अशोक गुप्ते, अरुण देशपांडे आदी लेखकांच्या कथाही वाचनीय आहेत. दिवाळी अंकाच्या पहिल्या भागात कथांच्या समावेश असून दुसऱ्या भागात आरोग्य धन संपदाचा मंत्रघोष अंकाने केला आहे. त्यात विस्मृती एक आजार, सर्व काही ह्रदयासाठी, फॅट टू फीट, आव आदी आजार व त्यावरील उपायांचा समावेश आहे. रुद्राक्षाचे मानवी जीवनातील महत्वही या अंकात अधोरेखीत केले आहे. ‘यंदा कर्तव्य आहे ? सावधान’ हा विवाहपद्धतीवर चर्चात्मक असा उमा देसाई यांचा लेखही प्रबोधनात्मक आहे. त्याचप्रमाणे कविरसिकांसाठी ‘काव्यकुंज’ही या अंकात आहे.
संपादक – श्रीनिवास शिरसेकर
पृष्ठे – २००,किंमत – ७० रुपये
सृष्टिज्ञान
विज्ञान विषयाला वाहिलेल्या सृष्टिज्ञान या मासिकाचा यंदाचा दिवाळी अंक हा विविध विषयांनी परिपूर्ण
देवकणाच्या प्रयोगात काम करणारे वैज्ञानिक डॉ. आशुतोष कोतवाल यांच्याविषयी त्यांच्या मातोश्री माणिक कोतवाल यांनी लिहिलेला लेख वैज्ञानिक घडवताना पालकांना नेमके काय करावे लागते याची माहिती देणारा आहे. अलिकडेच निवर्तलेले अमेरिकेचे पहिले चांद्रवीर नील आर्मस्ट्राँग यांच्या विषयीचा लेख असाच उल्लेखनीय आहे. आपण विवाह जुळवताना नेहमी पत्रिका जुळवत बसतो पण त्यापेक्षा रक्तगट जुळवणे किती महत्त्वाचे आहे यावर डॉ. दिलीप वाणी यांनी टाकलेला प्रकाशझोत, नोबेल पारितोषिक विजेते-सर जॉन गर्डन हे लेख विशेष उल्लेखनीय.
संपादक- राजीव विळेकर,
पृष्ठे-८०, किंमत- ५० रुपये
श्रमिक एकजूट
लोकशाहीपुढील आव्हाने या सदरात अशोक चौसाळकर, भाई वैद्य, माधव गोडबोले, जयदेव डोळे यांचे लेख वाचनीय आहेत. लढा जलसंकटाशी या संदर्भातील डॉ. माधव गाडगीळ, डॉ. माधवराव चितळे, डॉ. दि.बा. मोरे आदींचे लेख उल्लेखनीय आहेत.
संपादक- कृष्णा शेवडीकर
पृष्ठे -१७६, किंमत – ५० रुपये
लाजरी
संपादक – अजित पडवळ,
पृष्ठे – १४८, किंमत – १००