थायरॉइड ही फुलपाखराच्या आकाराची एक ग्रंथी असते. जिचं काम असतं थायरॉइड हार्मोन्सची निर्मिती करणं. मेंदू, हृदयाचे स्नायू तसंच शरीरातल्या इतर स्नायूंच्या कार्य नीट होण्यास तसंच शरीराला ऊर्जेच्या
हायपोथायरॉइडिझममध्ये आपल्या शरीराला आवश्यक तेवढय़ा थायरॉइड हार्मोन्सची निर्मिती करण्यास थायरॉइड ग्रंथी अपयशी ठरते. यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या कारणांमध्ये जास्त शारीरिक हालचाल न करणं, अयोग्य जीवनशैली, आनुवंशिकता यांसारख्या साध्या कारणांपासून रोगप्रतिकारशक्तीशी संबंधित आजार, शस्त्रक्रिया करून थायरॉइड ग्रंथी काढणं आणि रेडिएशन घेतलं असणं अशी गंभीर कारणंही चालतात.
याची लक्षणं म्हणजे चयापचय क्रियेचा वेग मंदावणे, वारंवार सर्दी होणं, त्वचा कोरडी पडणं, उत्साह न जाणवणं, बद्धकोष्ठता, वजनात सतत चढउतार होणं. बरेचदा हायपोथायरॉइडच्या रुग्णांचं वजन वाढतच जातं. या लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आहार हा महत्त्वाचा घटक ठरतो. जीवनशैलीत सुयोग्य बदल घडवून आणल्यास वजन नियंत्रणात ठेवणंही शक्य होतं.
त्यासाठी पुढील मार्गदर्शक सूत्रं अमलात आणावीत-
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निसर्गत उपस्थित राहणाऱ्या घटकाचं काही अन्नपदार्थामधलं अस्तित्व. त्यामुळे गॉइटरसारखी गंभीर समस्या उद्भवू शकते, ज्यात थायरॉइड ग्रंथींचा आकार वाढतो. त्यामुळे सोयाबीन, सॉय उत्पादनं, ब्रोकोली, कॉलीफ्लॉवर, कोबी, ब्रुसेल्स स्प्राऊट्स, टíनप्स, पीच, शेंगदाणे, मुळा हे गॉइट्रोजेन्स असणारे पदार्थ खाणं टाळावं. हे पदार्थ शिजवल्याने त्यातले घटक निकामी होतात, कारण ते उष्णता संवेदनशील असतात. परंतु हे पदार्थ केव्हा तरी आणि शिजवलेल्या स्थितीत खाणंच योग्य.
नाचणी, बाजरी, दाट हिरव्या रंगाच्या पालेभाज्या सूपच्या आणि रसाच्या स्वरूपात खाव्यात. टोमॅटो, गाजर, आंबे, पपई, अननस, संत्री ही पिवळी-नािरगी फळं खावीत. बदाम, अक्रोडसारखा सुकामेवा, अळशी, तीळासारख्या तेलबिया, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जसं लो-फॅट दूध/गाईचं दूध, ताक, दही आदींच्या सेवनाने आपण निरोगी राहतो.
हायपोथायरॉइडिझमवर कोणताच उतारा नाही. पण त्याचा अर्थ असा नव्हे की त्याची सर्व लक्षणं कायम तुमच्यासोबत राहतील. योग्य आहार, योगसाधना, बूट कॅम्प, अॅरोबिक्स, चालणं यासारखे व्यायाम आदींमुळे संपूर्ण शरीराला गती मिळते. या विकाराची लक्षणं कमी करता येतात आणि तुमच्यात खूप सकारात्मक बदल घडून येतील. जोडीला वजन कमी होईल, ते वेगळंच!
संग्रहित लेख, दिनांक 8th Mar 2013 रोजी प्रकाशित
मिकीज् फिटनेस फंडा : थायरॉइड आणि आहार…
आजकाल दिवसातले २४ तास कमीच वाटतात. नोकरी, आपलं कुटुंब, घरातली कामं आणि मुलं या सर्वाना न्याय देणाऱ्या आजच्या आधुनिक स्त्रीला तर हा वेळ कमीच वाटत असणार. त्यामुळे त्यांना दररोज प्रचंड ताणाला सामोरं जावं लागतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 08-03-2013 at 01:05 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mickeys fitness funda thyroid and diet