सोशल नेटवर्किंग साइट्सवर वेगवेगळे व्हिडीओ आपण नेहमी शेअर करत असतो. हल्ली व्हॉट्सअॅपवरदेखील असे अनेक व्हिडीओ प्रसंगानुरूप शेअर होत असतात. हे व्हिडिओ कोण तयार करत असतील, असा प्रश्नही अनेकदा पडतो. बहुतेकदा हौशी तरुणाईच या व्हिडीओंच्या निर्मितीमागे असते. असाच एक व्हिडीओ आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने यू टय़ूबवर रिलीज होतोय.
युनिटी ग्रुप इंडिया नावाने कार्यरत असणाऱ्या तरुणाईच्या एका ग्रुपने हा व्हिडीओ तयार केला आहे. तसा युनिटी ग्रूप इंडिया हा फेसबुकवर अॅक्टिव्ह असणारा गट. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने त्यांनी स्त्रीच्या विविध रूपांचा, कौशल्याचा गौरव करण्यासाठी या व्हिडीओची निर्मिती केली आहे. या व्हिडीओचा दिग्दर्शक शुभंकर करंडे हा मुंबईच्या रुईया महाविद्यालयात तिसऱ्या वर्षांचा विद्यार्थी आहे. ‘महाराष्ट्रातली स्त्री आधुनिक आहे. काळाप्रमाणे बदलली आहे. पण आपल्या संस्कृतीची नाळ तिने अजूनही तोडलेली नाही. हे सांगायचा प्रयत्न या व्हिडीओमधून केला आहे. आम्हा सर्वच तरुणांना आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे. त्यातूनच या व्हिडीओची निर्मिती केली आहे.’
या व्हिडीओला आदिनाथ पाटकरने संगीत दिलंय. तो पदवीच्या पहिल्या वर्षांचा विद्यार्थी आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या तरुणाईने आणि वेगवेगळ्या शाखेच्या विद्यार्थ्यांनी या व्हिडीओनिमित्ताने अभिनयाची झलक दाखवली आहे.
सम्जुक्ता मोकाशी -viva.loksatta@gmail.com
संग्रहित लेख, दिनांक 1st May 2015 रोजी प्रकाशित
महाराष्ट्र देशा
सोशल नेटवर्किंग साइट्सवर वेगवेगळे व्हिडीओ आपण नेहमी शेअर करत असतो. हल्ली व्हॉट्सअॅपवरदेखील असे अनेक व्हिडीओ प्रसंगानुरूप शेअर होत असतात.

First published on: 01-05-2015 at 01:04 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: My maharashtra