ओबामा फिव्हर
डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षीचा ट्रेलर
आतापर्यंत व्योमकेश बक्षीच्या पुस्तकी डिटेक्टिव्हगिरीला दाद देणाऱ्यांसाठी एक खूशखबर. ‘डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी’ हा चित्रपट एप्रिलमध्ये प्रदर्शित होतोय. दिवाकर बॅनर्जीनं डिरेक्ट केलेल्या या चित्रपटात चाळीसच्या दशकातील कोलकाता शहरामधला कालपट उलगडणारेय. सुशांतसिंग राजपूत व्योमकेशच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या यू टय़ूबवरील ट्रेलरला एका दिवसात २,८९, ८३२ व्ह्य़ूज मिळालेत.
https://www.youtube.com/watch?v=ZG–GOpi_0g
व्हॉट्सअॅप आता कॉम्प्युटरवर
‘व्हॉट्सअॅप’ या सध्याच्या सर्वाधिक लोकप्रिय मोबाइल अॅपचं वेब ब्राऊझर व्हर्जनही आलंय, हे फेसबुकवर टॉप ट्रेण्डिंग आहे. त्यामुळं नेटकरांना व्हॉट्सअॅपचा वापर आपल्या लॅपटॉप नि डेस्कटॉपवरून करता येणारेय. हे अॅप लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर सुरू करण्यासाठी क्रोम ब्राऊझरमधून https://web.whatsapp.com वर जावं लागेल. तिथं गेल्यावर दिसणारा क्यूआर कोड आपल्या मोबाइलवरील व्हॉट्सअॅपच्या साहाय्यानं स्कॅॅन केल्यावर तुम्हाला या ब्राऊझमधूनही व्हॉट्सअॅप वापरता येईल. यासाठी सर्वात आधी व्हॉट्सअॅपचं अपडेटेड व्हर्जन तुमच्या मोबाइलवर असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर इंटरनेटही सुरू असावं. ही सोय अॅण्ड्रॉइड, ब्लॅकबेरी आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमसाठी उपलब्ध आहे.
रणबीर रिअली ऑनलाइन?
ब्लाइंड कॉमेंट्री..
अभिनेता वरुण पृथ्वीचा एक व्हिडीओ सध्या नेटकरांमध्ये प्रचंड दाद मिळवतोय. त्यानं साधलेल्या संवादाचा हा व्हिडीओ आहे. इंग्रजी भाषेचा एबीसीडी माहीत नसणारी एक अंध व्यक्ती घडाघडा इंग्रजीतून रनिंग कॉमेंट्री करताना दिसतोय. कॉमेंट्री करताना त्यांचा तो इझिनेस, त्यात रमून जाणं नि ठासून भरलेला आत्मविश्वास.. यू टय़ूबवरील या व्हिडीओला एका दिवसात १०,६८२ व्ह्य़ूज मिळालेत. हा संवाद बघणाऱ्यालाच एक नवीन दृष्टी देऊन जातो. असे काही व्हिडीओज् आपल्याला देतात ती जगण्याची एक नवीन दिशा.. जी बघायलाच हवी..
https://www.youtube.com/watch?v=D0Q_
यू सेड इट
एसआरके अँप्रिसिएशन डे
शाहरुख खानचे चाहते जगभरात पसरलेत. त्यांच्यापकी ‘एसआरके युनिव्र्हस‘ या ट्विटर ग्रुपनं 25 जानेवारी हा ‘एसआरके अँप्रिसिएशन डे‘ म्हणून सेलिब्रेट केला. सगळ्या चाहत्यांनी केलेल्या ट्विटसमुळं आणि या ग्रुपनं आयोजलेल्या क्वीझच्या विजेत्यांना गिफ्ट व्हाऊचर देण्यात येणार असल्यामुळं टॉप ट्रेिण्डगपकी बनला होता.
राधिका कुंटे -viva.loksatta@gmail.com