नॉलेज अवर्स जी. के. ऑलिम्पियाड इंटरनॅशनल फाऊंडेशनतर्फे घेतलेल्या सामान्य ज्ञान ऑलिम्पियाडमध्ये प्रभात किड्स स्कूलचा नववीचा विद्यार्थी आदित्य टाले याने देशात प्रथम येण्याचा मान पटकावला.
याशिवाय, २६ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले असून १४ विद्यार्थी सुवर्णपदकाचे, तर १२ विद्यार्थी रौप्यपदकाचे मानकरी ठरले आहेत.
अमन गोतमारे, सानिया ठाकरे, साक्षी टेकडीवाल, ईशा आंबेकर, शुभंम भोपळे, अजिंक्य घाटोळे, सुमीत दांदळे, अमिता अग्रवाल, अमन शुक्ला, आकाश मंत्री, यश भागवत, ऋषिकेश टाले, अनिकेत बावस्कर, मयूर इवनाते यांचा सुवर्णपदक विजेत्यात, संस्कृती टाले, अथर्व माळी, पार्थ बावनकुळे, जय झापे, लविना गुरदासानी, तनया इंगळे, श्रीकांत पाचपिल्ले, साक्षी मंत्री, आदित्य िशदे, प्रज्वल वानखडे यांचा रजतपदक विजेत्यात समावेश आहे.
या यशाबद्दल या सर्व विद्यार्थ्यांचा शाळेत सत्कार करण्यात आला. या विजेत्यांचे सर्व थरांतून अभिनंदन होत आहे.