अमेरिकेतील पेरियार इंटरनॅशनल या संस्थेच्या वतीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष छगन भुजबळ यांना यंदाचा (२०१३ साठी) के. वीरमणी सामाजिक न्याय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. भारतातील ज्येष्ठ समाजसुधारक पेरियार ई.व्ही. रामस्वामी यांच्या अमेरिकेतील अनुयायांनी ही संस्था स्थापन केली आहे. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दर वर्षी पेरियार यांचे अनुयायी वीरमणी यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. महाराष्ट्रात भुजबळ यांनी दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक, माहिला अशा समाजातील उपेक्षित घटकांच्या सर्वागीण विकासासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन पेरियार संस्थेने त्यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर केला आहे. रोख एक लाख रुपये व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या पूर्वी व्ही. पी. सिंग, सीताराम केसरी, मायावती, एम. करुणानिधी आदींना या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Oct 2013 रोजी प्रकाशित
भुजबळ यांना अमेरिकेतील संस्थेचा पुरस्कार
अमेरिकेतील पेरियार इंटरनॅशनल या संस्थेच्या वतीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि अखिल भारतीय
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 10-10-2013 at 07:00 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal gets award from american organization