जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सध्याच्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी म्हणून बार्शी रस्त्यावरील नवीन शासकीय इमारतीत स्थलांतर होत आहे. उद्या (शनिवारी) दुपारी अडीच वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
लातूर जिल्हा निर्मितीनंतर १९८२मध्ये सध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात हे कार्यालय सुरू झाले. आता ही इमारत दुरुस्तीस आली आहे. तेथे नव्याने अद्ययावत प्रशस्त इमारत बांधण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. इमारत बांधकामासाठी म्हणून कार्यालयाचे तात्पुरते स्थलांतर बार्शी रस्त्यावरील ६ वर्षांपूर्वी बांधून तयार असलेल्या प्रशस्त इमारतीत होत आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते हा कार्यक्रम होत आहे. अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांची उपस्थिती असेल.