अत्याचार केल्याच्या एका विवाहितेच्या तक्रारीवरून कळमना पोलीस ठाण्यातील एका शिपायास कळमना पोलिसांनी अटक केली. सूर्यकांत सुभाषचंद्र तिवारी (रा. बालाजीनगर मानेवाडा रोड) हे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. कळमना परिसरात एक २६ वर्षांची महिला चहा विकते तर तिच्या पतीचा पानठेला आहे. सूर्यकांत तेथे चहा प्यायला जात असे. त्यातून त्यांची ओळख झाली. त्याच्या घरी सूर्यकांतचे जाणे-येणे वाढले. ऑक्टोबर महिन्यात सूर्यकांत त्या महिलेच्या घरी गेला होता. पती नसल्याने त्याने अत्याचार केला. तो तिच्या घरी वांरवार कामानिमित्त येत होता आणि पती घरी नसताना आरोपीने अत्याचार केल्याची तक्रार त्या महिलेने काल रात्री कळमना पोलीस ठाण्यात केली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सूर्यकांतला अटक केली.