ख्रिसमसनिमित्त बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होती. शहर व परिसरातील विविध चर्चमध्ये आकर्षक रोषनाई करण्यात आली आहे. शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
सदर, सीताबर्डी, बैरामजी टाऊन परिसरातील दुकानांमध्ये सजावटीचे सामान खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. सजावटीच्या साहित्यामध्ये स्टार स्टॅचू माती व प्लॅस्टिकचे, स्टार विथ क्रिब, पेपर क्रिब, सॅन्टाक्लॉजचे मुखवटे तसेच सॅन्टा ड्रेस, ख्रिसमस ट्री लाईटसह, सिल्व्हर टिप ट्री, कॅन्डल, तसेच कॅन्डलबरोबर ख्रिसमस ट्री, स्ट्रीमर्स निरनिराळ्या रंगात, पांढरे स्टार, ख्रिसमस बबल्स नऊ रंगात उपलब्ध आहेत, तसेच ख्रिसमस ट्रीसाठी गिफ्ट बॉक्स, रॅपिंगसाठी चेन, डोअर रिथ, पेपर डिश, ग्लास बॉल, शुभेच्छा बॅनर, ट्रिंकलेट बेल, निरनिराळ्या आकारातील स्टार आदी सजावटीच्या साहित्यांच्या खरेदीसाठी दुकानात गर्दी झाली होती.
शहरातील विविध भागातील बेकरीमध्ये नाताळ सणासाठी निरनिराळे केक विक्रीस आहेत. व्हेज-नॉनव्हेज दोन्ही प्रकारात हे केक उपलब्ध आहेत. रिच प्लम केक, रम केक, फूट्र केक, पिस्ता केक, चॉकलेट, वॉलनट, डेट्स अँड नट्स, रिबन केक हे क्रीम नसलेले केक असून, प्रेझेंटेशन केकमध्ये वाईन केक, तसेच स्वीट्स, मार्झिपान स्वीट्स, गवाचिज, कोकोनट बर्फी, रमबॉल्स, स्पाँजकेक, बटरस्कॉच वॉलनट
असे निरनिराळे प्रकार उपलब्ध आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 25th Dec 2014 रोजी प्रकाशित
नाताळनिमित्त बाजारात ग्राहकांची गर्दी
ख्रिसमसनिमित्त बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होती. शहर व परिसरातील विविध चर्चमध्ये आकर्षक रोषनाई करण्यात आली आहे. शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

First published on: 25-12-2014 at 01:08 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Customers rush to markets for christmas purchasing