महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यमान दोन तालुकाध्यक्षांना जिल्हाध्यक्ष पदावर बढती, तर दोन्ही जिल्हाध्यक्षांची जिल्हा सचिव पदावर नियुक्ती करून नव्या कार्यकारिणीत शिक्षा मिळाली. डॉ. भास्कर सानप, सुमन धस या जिल्हाध्यक्षांसह १३ जणांची कार्यकारिणी जाहीर झाली असून रेखा फड व वर्षां जगदाळे यांच्याकडे महिला जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविली आहे. आमदार बाळा नांदगावकर यांनी जाहीर केलेली कार्यकारीणी ‘मनसे’ च असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.
आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर मनसेची नवी टीम निवडण्यासाठी पक्षनेते आमदार नांदगावकर, सरचिटणीस अविनाश अभ्यंकर, आमदार मंगेश सांगळे, महिला उपाध्यक्षा शिल्पा सरपोतदार, शिवाजीराव नलावडे व गणेश महाले या नेत्यांनी जिल्ह्यात दौरा करून मनसे सनिकांच्या भावना जाणून घेतल्या. त्यानंतर मंगळवारी नवीन कार्यकारिणी जाहीर केली. कार्यकारिणीत विद्यमान जिल्हाध्यक्ष अशोक तावरे व महेश चौधरी यांना माजलगाव व गेवराई मतदारसंघाचे सचिव करण्यात आले.
स्थापनेपासून पक्षात कार्यरत तावरे यांना नवीन कार्यकारिणीत पदावनत करण्यात आले, तर विद्यमान दोन तालुकाध्यक्षांना थेट जिल्हाध्यक्षपदी बढती मिळाली. पाटोद्याचे तालुकाध्यक्ष डॉ. भास्कर सानप यांना बीड, गेवराई, आष्टी, पाटोदा मतदारसंघांचे जिल्हाध्यक्ष, तर केज तालुकाध्यक्ष सुमन धस यांना माजलगांव, केज, अंबाजोगाई, परळी मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष करण्यात आले. या दोघांच्या मदतीला रेखा फड व वर्षां जगदाळे यांच्याकडे महिला सेना अध्यक्षपदाची जबाबदारी टाकण्यात आली. जिल्हा सचिव म्हणून गोिवद वनवे, संदीप ढाकणे, महेश चौधरी, अशोक तावरे, बाळासाहेब जगताप, दत्ता दहिवाळ, तर उपाध्यक्षपदी वैभव काकडे, राजू मोटे व संजीव आघाव यांना विधानसभा मतदारसंघ निहाय नियुक्त करण्यात आले. तालुकाध्यक्ष असे – शरद आर्सुळ (बीड), दीपक उंबरकर (आष्टी), प्रमोद मोटे (गेवराई), अभिजित खेडकर (शिरूर), बाळासाहेब मस्के (माजलगाव), विठ्ठल शिनगारे (धारूर), श्रीराम बादाडे (वडवणी), दत्ता तांदळे (केज), केशव ढगे (अंबाजोगाई), प्रल्हाद सुरवसे (परळी), तर शहराध्यक्ष म्हणून संजय िभगाले (बीड), भारत मिटकरी (माजलगाव), सुनील जगताप (अंबाजोगाई), श्रीकांत पाथरकर (परळी), बाळासाहेब कुरंदकर (धारुर) यांची नियुक्ती झाली.