पांगरी सेवा सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे जिल्हा बँकेकडून तब्बल दीड कोटी रुपये उचलून गैरव्यवहार केल्याचे चौकशीत उघड झाल्यानंतर संस्थेच्या अध्यक्ष, सचिवासह शाखाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आर्थिक दिवाळखोरीत निघाल्यामुळे बंद पडली आहे. बाराशे कोटींच्या ठेवी असलेल्या बँकेला राजकीय पुढाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वानीच संधी मिळेल तसे बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज उचलून लुटल्याचे एका प्रकरणात उघडकीस येत आहे. प्रशासकीय अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी अत्यंत नियोजनबद्ध रीत्या बँकेतील गैरव्यवहार शोधून काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे बँकेस कोणी कसे लुटले हे समोर येत आहे. परळी तालुक्यातील पांगरी संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांनी बँकेच्या ३ कर्मचाऱ्यांशी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे दीड कोटी हडप केल्याचे उघड झाले. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.       

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fir launched against officer involvement in malpractice