भारतीय सैन्य दलातील जवान हुतात्मा सात्ताप्पा महादेव पाटील यांच्या पार्थिवावर रविवारी बेलवडे मासा (ता.कागल) येथे शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात आला. हुतात्मा सात्ताप्पा पाटील अमर रहे, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा हजारो नागरिकांतून दिल्या जात होत्या. ग्रामस्थांनी साश्रुपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला.
श्रीनगर येथे अतिरेक्यांशी लढतांना जवान सात्ताप्पा पाटील यांना गुरुवारी वीरमरण आले होते. ही माहिती कालच त्यांच्या बेलवडे मासा या गावी पोहोचल्यावर गावावर शोककळा पसरली होती. बेलवडेसह तालुक्यातील हजारो नागरिक हुतात्मा सात्ताप्पा पाटील यांच्या पार्थिवाची काल रात्रीपासूनच प्रतीक्षा करीत होते. सकाळी पुणे येथून लष्कराच्या वाहनातून पार्थिव सकाळी ७ वाजता कोल्हापुरात आणण्यात आले. त्या सोबत रायफल चीफ विनोदकुमार वर्मा, कर्नल विजयकुमार, कर्नल आलेख मोहन, सुभेदार प्रतापसिंह आदी होते. सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास पार्थिव बेलेवाडी गावात आणण्यात आले. तेथे काही काळ पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले.
गावाच्या पश्चिम भागात असलेल्या पटागंणावर अंत्यविधीची सोय करण्यात आली होती. हजारो नागरिक अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. हुतात्मा सात्ताप्पा पाटील अमर रहे, अशा घोषणा देणारे फलक जागोजागी लावण्यात आले होते. तशा घोषणाही सातत्याने दिल्या जात होत्या. त्याचबरोबर पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाही नागरिकांतून उमटत होता. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वडील महादेव पाटील यांनी भडाग्नी दिला. या वेळी बंदुकीच्या फैरी हवेत झाडण्यात आल्या. अंत्यविधीवेळी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रा.संजय मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे, नाविद मुश्रीफ, जिल्हाधिकारी राजाराम माने आदी उपस्थित होते.
Normal
0
MicrosoftInternetExplorer4
हुतात्मा सात्ताप्पा पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यविधी
प्रतिनिधी, कोल्हापूर

/* Style Definitions */
table.MsoNormalTable
{mso-style-name:”Table Normal”;
mso-tstyle-rowband-size:0;
mso-tstyle-colband-size:0;
mso-style-noshow:yes;
mso-style-parent:””;
mso-padding-alt:0in 5.4pt 0in 5.4pt;
mso-para-margin:0in;
mso-para-margin-bottom:.0001pt;
mso-pagination:widow-orphan;
font-size:10.0pt;
font-family:”Times New Roman”;}