पदवीधारकांनी समाजातील उपेक्षित व शिक्षणापासून वंचितांसाठी काम करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले पाहिजे, असे प्रतिपादन मुक्त विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. दिनेश भोंडे यांनी केले. येथील महावीर भवनात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा पदवी वितरण सोहळा डॉ. भोंडे यांच्या हस्ते पार पडला. डॉ. भोंडे म्हणाले की, समाजाच्या गरजेनुसार मुक्त विद्यापीठाने विविध शिक्षणक्रम विकसित केले. मुंबईच्या डबेवाल्यांपासून बचतगटांच्या महिलांपर्यंत सायबर सिक्युरिटी प्रोग्रामिंगपासून ते मरीन इंजिनिअरींगपर्यंत टॅक्सीचालक, पोलीस, नेव्ही कर्मचारी, सीमेवरचे जवान आदींसाठी त्यांचे ज्ञानकौशल्य विकसित करण्यासाठी मुक्त विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे प्रयत्न आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Knowdge should be reach to denied peoples