कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या यंदाच्या कोकण साहित्य भूषण पुरस्कारासाठी कोकणातील ज्येष्ठ लेखक प्रभाकर भुस्कुटे यांची निवड करण्यात आली आहे.
‘कोमसाप’चे अध्यक्ष डॉ. महेश केळुस्कर यांनी भुस्कुटे यांच्या नावाची घोषणा केली. ५ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आदर्श शिक्षकासाठीचा राष्ट्रपती पुरस्कार मिळविलेले भुस्कुटे गुरुजी रायगड जिल्ह्यातील साहित्य-सांस्कृतिक चळवळीत नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. ‘श्वेता’ हा कथासंग्रह, ‘झोलूबाईचं चांगभलं’, ‘शिल्पा’ या कादंबऱ्या लिहिणाऱ्या भुस्कुटे यांनी लहान मुलांसाठीही काही पुस्तकांचे लेखन केले आहे.