तब्बल बारा वर्षांनंतर झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मनोहर नाईक यांच्या नेतृत्वाखाली  शेतकरी पॅनलने बहुमत प्राप्त केले .
मंगळवारी तंत्रनिकेतन विद्यालयात मतमोजणीला प्रारंभ झाला. यात व्यापारी-अडते मतदारसंघातील विजय राधाकिसन भांगडे ८८ मते तर, वल्लभदास जुगलकिशोर बजाज ७६ मते घेऊन विजयी झाले. हमाल-मापारी मतदारसंघातून दत्ता कावळे ५२ मते घेऊन आपले प्रतिस्पर्धी गुलाब उतळे यांच्यावर ४९ मते घेऊन निसटता विजय मिळवला. कृषी पत, बहुउद्देशीय सह. संस्था सर्वसाधारण मतदारसंघातून बळीराम चव्हाण ३७१ मते, प्रेम मारोती देशमुख ३७२ मते, चंद्रशेखर दत्तराव नाईक ३६८, अभय राठोड ३७७, लक्ष्मण राठोड ३८२, विठ्ठल राठोड ३७३ मते घेऊन विजयी ठरले, तसेच महिला राखीव मतदारसंघात माला अनिल आडे ३७०, कावेरी बाभुळकर ३६१ मते घेऊन विजयी मिळवला. सर्वसाधारणमधून मारोती िलबाजी गोरे ६४१, तर देवसिंग रामा राठोड ६४० मते घेऊन विजयी झाले. अनु.जाती /जमाती मतदारसंघातून राजेश वाहुळे ६५७ मतांनी विजयी झाले. आर्थिकदृष्टय़ा दुर्बलमधून शेख कौसर शे. अख्तर ५७८ मतांनी विजयी झाले. पणन प्रक्रिया सह. संस्था मतदारसंघातून अण्णासाहेब ठेंगे २० मते हे आपले प्रतिस्पर्धी दत्तराव िशदे १० मते यांच्यापेक्षा १० मते घेऊन विजयी झाले. पूर्वीच कृषी पत बहुउद्देशीय सह. संस्था मतदारसंघातून इतर मागास प्रवर्गातून रवींद्र निकम व विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातून संतोष चव्हाण हे अविरोध निवडून आले आहेत. वल्लभदास बजाज हे एकमेव अपक्ष उमेदवार वगळता नाईक समर्थित शेतकरी पॅनलचे १८ उमेदवार निवडून आल्याने पुन्हा एकदा कृषी उत्पन्न बाजार समितीवर नाईकांचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.