एक दिवसाच्या वेतनाचे तीन कोटी
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व थरांतून मदतीचे हात पुढे येत असून राज्यातील राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही त्यांच्या एक दिवसाचे वेतन दुष्काळग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात एकूण १२ हजार राजपत्रित वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यांच्या एक दिवसाच्या वेतनातून तीन कोटी रुपये जमा झाले आहेत. राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांची कार्यसंस्कृती कार्यशाळा अलीकडेच ठाण्यात पार पडली. त्या वेळी हा निर्णय जाहीर करण्यात आला. दरवर्षी संघटनेच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालयात वेळोवेळी आरोग्य तसेच रक्तदान शिबिरे घेतली जातात.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 07-03-2013 at 02:09 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Medical officers gives the help in drought areas