महापौर कला ओझा यांच्या प्रभाग ७० मध्ये पाणीपुरवठा अधिकारी सातत्याने दुर्लक्ष करून नागरिकांना वेठीत धरत आहेत. महापौर ओझा यांच्याशी नागरिकांनी संपर्क साधला असता त्या समाधानकारक उत्तर देत नाहीत. नागरिकांना वेठीस धरून पिण्याच्या पाण्याचे राजकारण केले जात असल्याचा आरोप करून मनसेतर्फे या प्रश्नी आंदोलन करण्यात आले.
महापौरांच्या प्रभागात सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता मनसेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. प्रभागातील नागरिकांना पाणी द्या नाही तर खुर्ची खाली करा अशा घोषणा देत महापौर व महापालिकेचा या वेळी निषेध करण्यात आला. प्रभागातील नागरिकांना पाणीपुरवठा न झाल्यास मनसेतर्फे महापालिकेत काम बंद आंदोलन हाती घेण्याचा इशारा देण्यात आला. आंदोलनात मनसेचे शहराध्यक्ष डॉ. शिवाजी कान्हेरे, अजय गटाणे, रवी गायकवाड, अॅड. नूतन जैस्वाल, लीला देशमुख, डॉ. सुनीता साळुंके, कृष्णा सातपुते आदी कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.
संग्रहित लेख, दिनांक 4th Apr 2013 रोजी प्रकाशित
महापौरांच्या प्रभागात मनसेचे पाणीप्रश्नावर धरणे आंदोलन
महापौर कला ओझा यांच्या प्रभाग ७० मध्ये पाणीपुरवठा अधिकारी सातत्याने दुर्लक्ष करून नागरिकांना वेठीत धरत आहेत. महापौर ओझा यांच्याशी नागरिकांनी संपर्क साधला असता त्या समाधानकारक उत्तर देत नाहीत.

First published on: 04-04-2013 at 01:58 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns hold agitation on water problem in mayors ward