अंबरनाथमधील रस्ता रुंदीकरणाच्या आड येणारी जलवाहिनी हटविण्याच्या मुद्दय़ावरून झालेल्या वादातून मनसे कार्यकर्त्यांनी जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार बुधवारी संध्याकाळी घडला. त्यामुळे काही काळ वातावरण तंग बनले होते. पूर्व विभागातील वडवली वेल्फेअर सेंटर ते लोकनगरी दरम्यानच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाआड येणारी जलवाहिनी त्वरित हटविण्यासाठी पालिकेने जीवन प्राधिकरणास पत्रही लिहिले होते. मात्र तरीही या विभागाकडून कारवाई करण्याबाबत टाळाटाळ होत असल्याबद्दल जाब विचारण्यासाठी नियोजन सभापती आणि मनसेचे गटनेते संदीप लकडे कार्यकर्त्यांसह जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात गेले. तेव्हा अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्याने मनसे कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली. येत्या आठ दिवसांत जलवाहिन्या हटविण्याचे काम न केल्यास जीवन प्राधिकरणच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.
संग्रहित लेख, दिनांक 12th Jul 2013 रोजी प्रकाशित
मनसेकडून अधिकाऱ्यांना धक्काबुक्की
अंबरनाथमधील रस्ता रुंदीकरणाच्या आड येणारी जलवाहिनी हटविण्याच्या मुद्दय़ावरून झालेल्या वादातून मनसे कार्यकर्त्यांनी जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार बुधवारी संध्याकाळी घडला. त्यामुळे काही काळ वातावरण तंग बनले होते. पूर्व विभागातील वडवली वेल्फेअर सेंटर ते
First published on: 12-07-2013 at 09:39 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns supporters clash with corporation officer