गंगाखेड येथील व्यापारी जगदीश नरहरी काळे यांचा परभणीच्या ऊरसात खून केल्याचा प्रकार घडला. अनतिक संबंधातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
काळे हे सोमवारी (दि. १०) येथे ऊरूस पाहण्यास आले होते. कारेगाव रस्त्यावरील क्रांती नगरात काकाच्या घरी सायंकाळी येऊन रात्री ऊरसात गेले होते. पहाटे साडेपाचच्या सुमारास ४ ते ५ अनोळखी व्यक्तींनी जखमी अवस्थेत काळे यांना काकाच्या घरासमोर आणून सोडले व ते पसार झाले. काळे यांचे काका व इतरांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आपल्याला ४-५ जणांनी पट्टा, काठी व दगडाने मारहाण केल्याचे मृत्यूपूर्वी काळे यांनी आई विमल काळे यांना सांगितले. विमल काळे यांनी नवा मोंढा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अनोळखी आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला.