राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत नवी मुंबईतील गुन्ह्य़ांचे प्रमाण कमी आहे पण हे शहर झपाटय़ाने वाढत असल्याने लवकरच चार नवीन पोलीस ठाणी सुरू केली जाणार असल्याची माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्त अशोक शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. वाशी व नेरुळसाठी आणखी दोन स्वतंत्र पोलीस ठाण्यांची आवश्यकता असून हे शहर संपूर्ण सी सी टीव्हीच्या नियंत्रणाखाली येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नवी मुंबईत २०११ रोजी एकूण ५५११ विविध गुन्हयाची नोंद झाली असून २०१२ रोजी ही संख्या ४ हजार ९२२ आहे. यात गुन्ह्य़ाची उकल होण्याचे प्रमाण ६० टक्के आहे हे प्रमाण वाढविण्याचे आवाहन पोलिसांसमोर असल्याचे शर्मा यांनी घेतलेल्या वार्षिक गुन्हे आढावा बैठकीत सांगितले. पोलीस ठाण्यात कितीही गुन्हे नोंद झाले, तरी ते नोंद केले गेले पाहिजेत असे स्पष्ट करून शर्मा यांनी गुन्हा नोंद न करण्याची कारणे पोलिसांकडून तात्काळ लेखी मागून घ्या असे सांगितले.
नवी मुंबई मेगासिटी होत असून यानंतर गुन्हयाचे प्रमाण आजच्या पेक्षा अधिक वाढणार आहे. त्यासाठी खांदेश्वर, कामोठे, आणि रबाले व तुर्भे एमआयडीसीत येत्या दोन महिन्यात चार नवीन पोलिस ठाणी सुरू करण्यात येणार त्यांनी स्पष्ट केले. नवी मुंबई पालिकेने दहा कोटी रुपये खर्च करुन २७२ सीसी टीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सुरू असून ते येत्या एक महिन्यात पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. महिलांवरील अत्याचरीचे प्रमाण नवी मुंबईत कमी आहे मात्र चेन स्नॅचिंग आणि अपघातांचे प्रमाण जास्त आहे. पामबीच व सायन पनवेल महामार्गावर वाढणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिसांना विविध उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले असून गतवर्षी ही संख्या ३३४ होती. नवी मुंबईत गेल्यावर्षी ५७ खून झाले असून त्या पैकी पोलिसांनी ५२ खूनांचा छडा लावला आहे. विस्तीर्ण असा सागरी किनारा लाभलेल्या नवी मुंबईत सागरी गस्त  वाढविण्यात आली आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या गुन्ह्य़ांचा पोलिसांनी १०० टक्के शोध लावला असल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले.

anurag is a ticket of hollywood for me-manoj bajpai
entertainment, manoj bajpai, hollywood
अनुराग हा माझ्यासाठी हॉलिवुडचे तिकीट – मनोज वाजपेयी
प्रतिनिधी, मुंबई<br />अनुराग कश्यपच्या गॅंग्ज ऑफ वासेपूर या चित्रपटातील अभिनयामुळे मनोज वाजपेयीला समीक्षकांकडूनही पसंतीची पावती मिळाली आणि लोकांनाही तो फार आवडला. शिवाय, हा चित्रपट देशविदेशातील महोत्सवांमधून दाखवला गेल्याने मनोजला आता हॉलिवुडच्या दिग्दर्शकांकडूनही चित्रपटासाठी विचारणा होऊ लागली आहे. आपण हॉलिवुड चित्रपट करण्याच्या मार्गावर आहोत आणि तिथे पोहोचण्याचे श्रेय फक्त आणि फक्त दिग्दर्शक अनुरागला आहे, असे मनोज वाजपेयीने म्हटले आहे. अनुराग म्हणजे माझ्यासाठी हॉलिवुडचे तिकीट आहे, अशा शब्दांत आपल्या दिग्दर्शकाचे कौतुक मनोजने केले आहे.
गॅंग्ज ऑफ वासेपूर या चित्रपटाचा प्रीमिअर कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाला होता. त्यानंतर अनेक नामांकित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांपैकी सिडनी फिल्म फेस्टिव्हलमध्येही तो दाखवण्यात आला. अनुरागने हा चित्रपट आंतरराष्ट्रीय महोत्सवांमधूनही दाखवल्यामुळे मनोजचे काम हॉलिवुड दिग्दर्शकांच्याही नजरेस पडले. त्यामुळे त्याला आता तेथील चित्रपटकर्मीकडून विचारणा होऊ लागली आहे.
 ‘माझ्याकडे काही प्रस्ताव आले आहेत. सध्या मी एका स्वतंत्र अमेरिकन चित्रपटकर्मीकडून आलेली पटकथा वाचतो आहे. हा चित्रपट कुठल्याही स्टुडिओकडून आलेला नाही. त्यामुळे एक अभिनेता म्हणून स्वातंत्र्य मिळेल, असे वाटते. या चित्रपटाची बोलणी यशस्वी झाली तर मी नक्कीच हा आंतरराष्ट्रीय चित्रपट करेन’, असा विश्वास मनोजने व्यक्त केला आहे.
‘मला हॉलिवुडच्या ऑफर्स येतायत त्याचे कारण अनुरागच आहे. मी सतत अनुरागकडे चांगल्या पटकथांसाठी तगादा लावला होता. आत्ता जे चित्रपट माझ्याकडे आले आहेत ते त्याच्या सांगण्यावरूनच आले आहेत. म्हणून अनुराग हा माझ्यासाठी हॉलिवुडचे तिकीट आहे’, असे मनोजने बोलून दाखवले.
मला मोठय़ा आंतरराष्ट्रीय चित्रपटांतून काम करण्यापेक्षा छोटय़ा पण वेगळ्या विषयावरच्या चित्रपटातून काम करायला आवडेल, असेही मनोजने पुढे म्हटले आहे. ‘मी एकदा तब्बूचे या विषयावरचे मत ऐकले होते. मला ऑस्कर विजेत्या अ‍ॅंग ली सारख्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात छोटी भूमिका जरी मिळाली तरी ती मी आवडीने करेन, असे ती म्हणाली होती. तिचे म्हणणे खरेच आहे. एकतर आपले आयुष्य हे छोटे आहे. अशी चांगली संधी पुन्हा तुमचे दार कधी ठोठावेल हे कोण सांगणार,’असे सांगत मनोजने आपल्या चित्रपटांच्या निवडीमागची भूमिका स्पष्ट केली.
‘मी याआधी फक्त यश चोप्रांच्या हाताखाली काम करायचे म्हणून वीर झारा केला होता. पण, अशाप्रकारे काम करण्यासाठी ती भूमिका करण्याची उर्मी तुम्हाला आतूनच यायला हवी’, असेही त्याने आग्रहाने सांगितले.