दरवर्षी नववर्षांच्या स्वागतासाठी आयोजित केले जाणारे कार्यक्रम, त्यांना सेलिब्रिटी कलाकारांची हजेरी, मिनिटा-मिनिटांसाठीचे त्यांचे मानधन अशा सगळ्या गोष्टींची चर्चा होते. मात्र, यावर्षी कुठल्याही कार्यक्रमात नाचगाणी करून कोटी कमावण्याच्या विचाराला बॉलिवूडच्या नामी कलाकारांनी फाटा दिला आहे. उलट, वर्षभर चित्रपटांनी कोटींचे आकडे पार करावेत म्हणून धडपडून दमलेल्या या कलाकारांनी नववर्षांसाठी देशात-परदेशात विविध ठिकाणी आपापल्या मित्रांबरोबर, नातेवाईकांबरोबर पार्टी करायचे बेत आखले आहेत.
नववर्ष साजरे करण्यासाठी नेहमीप्रमाणे सगळ्यात पहिल्यांदा गुपचूप बाहेर पडणारे जोडपे आहे ते रणबीर कपूर आणि कतरिना कैफ. ‘आम्ही नाही हो त्यातले..’ असा एकच सूर आळवायचा आणि आपल्याला जे हवे तेच करायचे हा त्यांचा खाक्या त्यांनी यावेळीही जपला असून ते दोघेही त्यांच्या आवडत्या ठिकाणी अर्थात, न्यूयॉर्कला रवाना झाले असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे रणबीर आणि कतरिनाचे गुपित उघडे करणारी त्याची बहीण करीना कपूर खान आणि सैफ अली खान हे जोडपे नवीन वर्षांच्या स्वागतासाठी त्यांच्या आवडत्या ठिकाणी म्हणजेच स्वित्र्झलडला जाणार आहेत. तर बॉलिवूडचा बादशाह किंग खान आपल्या कुटुंबासह थायलंडमध्ये फुकेतला नववर्षांची पार्टी करणार आहे. गेले वर्षभर काम करून थकलेली अभिनेत्री दीपिका पदुकोण यावेळी आपल्या कुटुंबाबरोबर नववर्ष साजरे करणार आहे. दीपिका मालदीवमध्ये आपल्या कुटुंबाबरोबर आणि मित्रपरिवाराबरोबर पार्टी करून ३१ डिसेंबरलाच मुंबईत पोहोचणार असल्याचे समजते. दुबई हेही गेल्या काही वर्षांत कित्येक बॉलिवूड कलाकारांचे आवडते ठिकाण बनले आहे. खरेतर, शाहरूख आणि सलमान खान दोघांचीही दुबई आवडती आहे. मात्र, यावर्षी यात नवीन नावाची भर पडली आहे ती अभिषेक बच्चनची. अभिषेक -ऐश्वर्या आणि आराध्या हे बच्चन त्रिकूट दुबईत असणार आहे. तर चित्रपट दिग्दर्शक करण जोहरही यावेळी मित्रांसोबत दुबईत नववर्ष साजरे करणार आहे. करण आणि अयान मुखर्जी हे दोघेही यावेळी रणबीर आणि कतरिनाबरोबर न्यूयॉर्कमध्ये पार्टी करणार होते पण, अगदी शेवटच्या क्षणाला या प्रेमी जोडप्याला न्यूयॉर्कमध्ये सोडून दुबईतच पार्टी करण्याचे त्या दोघांनी ठरवले.
एवढी सगळी मंडळी बाहेर असली तरी बॉलिवूडचे दोन खान मात्र इथेच नवीन वर्षांचे स्वागत करणार आहेत. सलमान खान नेहमीप्रमाणे पनवेलमधील फार्महाऊसवर मोठी पार्टी करणार आहे. या पार्टीत आमिर आणि किरण राव यांचीही हजेरी असेल. तर सलमानच्या घरची पार्टी संपल्यानंतर आमिरही किरण आणि आझादसह पाचगणीला आपल्या बंगल्यात नवीन वर्षांचे जंगी स्वागत करणार आहे. याशिवाय, अक्षय कुमार व ट्विंकल तसेच सोनम कपूर गोव्यात असणार आहेत. एकटी प्रियांका चोप्रा सोडली तर बॉलिवूडचे आघाडीचे कलाकार नवीन वर्षांची पार्टी करताना दिसणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 28th Dec 2013 रोजी प्रकाशित
नववर्ष स्वागताच्या पाटर्य़ा सुन्यासुन्या!
दरवर्षी नववर्षांच्या स्वागतासाठी आयोजित केले जाणारे कार्यक्रम, त्यांना सेलिब्रिटी कलाकारांची हजेरी, मिनिटा-मिनिटांसाठीचे त्यांचे मानधन अशा सगळ्या गोष्टींची

First published on: 28-12-2013 at 01:08 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No celebrity performance in new year party