मान्सूनच्या पाश्र्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. ३१ मेपूर्वी नालेसफाई व रस्त्यांची कामे पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या असून रस्त्यांवर नवीन खोदकाम करण्यासाठी परवानगी देणे बंद करण्यात आले आहे.
शहरातील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी आयुक्त दिनेश वाघमारे यांनी बैठकीचे आयोजन केले होते. साफसफाईच्या कामामध्ये निष्काळजीपणा केला जाऊ नये यासाठी २४ तास कार्यरत असणारा नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहे.
महापालिका मुख्यालयामध्ये मुख्य केंद्र सुरू केले जाणार असून ऐरोली, वाशी, नेरुळ अग्निशमन केंद्राच्या ठिकाणी आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू केला जाणार आहे. महावितरणनेही आवश्यक ती दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत, अशा सूचना या बठकीत देण्यात आल्या आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 8th May 2015 रोजी प्रकाशित
नालेसफाई ३१ मे पूर्वी करण्याचे आदेश
मान्सूनच्या पाश्र्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे.
First published on: 08-05-2015 at 08:19 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Order of sewerage cleaning before may