शहरातील नवोदित हौशी छायाचित्रकार सोनाली जोशी यांनी काढलेल्या विविध छायाचित्रांचे प्रदर्शन १८ ते २० या कालावधीत येथील गंगापूर रस्त्यावरील कुसुमाग्रज स्मारकात भरविण्यात येणार आहे.
‘मनलहरी’ या प्रदर्शनात सोनाली यांनी त्यांच्या नजरेतून टिपलेला नाशिक परिसरातील निसर्ग विविध पैलूतून मांडण्यात आला आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता प्रसिध्द छायाचित्रकार प्रसाद पवार यांच्या हस्ते होणार आहे. रसिकांनी या प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चांदवड महाविद्यालयाचा नायजेरियन विद्यापीठाशी करारप्रतिनिधी, नाशिक
नायजेरियन विद्यापीठाने ‘नॅनो टेक्नॉलॉजी’ या विषयामध्ये संशोधन व परस्पर सहकार्यासाठी चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन सस्थेच्या आबड कला, लोढा वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाशी करार केला आहे.
या करारातंर्गत महाविद्यालय नायजेरियन विद्यापीठात नॅनो साहित्यावर आधारित गॅस सेन्सॉर युनिट विकसित करण्यासाठी सहकार्य करणार असून याच क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. या करारामुळे महाविद्यालयास आंतररराष्ट्रीय व्यासपीठ प्राप्त झाल्यााचे संस्थेचे प्रबंध समिती अध्यक्ष बेबीलाल संचेती यांनी सांगितले या करारासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. एच. जैन तसेच नायजेरियन विद्यापीठाच्या नॅनो रिसर्च ग्रुपच्या प्रमुख डॉ. रोझ इसुजी, आंतरराष्ट्रीय संबंध प्रमुख डॉ. फबियन इझेमा यांनी विशेष प्रयत्न केले.